पुणे - पुणे शहराला खडकवासला धरणातून पाणी पुरवठा केल्यानंतर पुणे महापालिकेकडून त्यावर प्रक्रिया केली जाते. लाखो नागरिकांना महापालिका रोज अतिशय शुद्ध पाणी पुरवठा करत असल्याने याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. यासह पाणी पुरवठ्याबाबत इतर उपाययोजनांचा विचार करून केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातर्फे शहरी विभागात पुणे महापालिकेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याचे वितरण २२ ऑक्टोबर रोजी दिल्लीत केले जाणार आहे.