बालगंधर्वमध्ये रंगला होता लता दीदींचा सन्मान सोहळा

काही वर्षाचे बालपण पुण्यात घालवणाऱ्या लता दीदींचे पुण्याशी नाते अतूट होते. महापालिकेने त्यांचा सन्मान करून हे नाते अधिक दृढ केले.
Lata Mangeshkar
Lata MangeshkarSakal
Updated on
Summary

काही वर्षाचे बालपण पुण्यात घालवणाऱ्या लता दीदींचे पुण्याशी नाते अतूट होते. महापालिकेने त्यांचा सन्मान करून हे नाते अधिक दृढ केले.

पुणे - पुणे महापालिकेने (Pune Municipal) लता दीदींना (Lata Didi) मानपत्र (Certificate) देऊन सन्मानित (Honorable) करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तारीख निवडली २३ एप्रिल १९८७ आणि स्थळ होते बालगंधर्व रंगमंदिर. (Balgandharv Auditorium) खर तर हा कार्यक्रम होता केवळ निमंत्रितांसाठीच होता. पण लता दीदींच्या प्रेमाखातर पुणेकरांनी गर्दी केली. बालगंधर्व रंगमंदिर आणि त्याचा परिसर हजारो नागरिकांच्या गर्दीने खचाखच भरला होता. लता दीदींच्या निधनाने महापालिकेने केलेल्या सन्मानाची आठवण ताजी झाली.

काही वर्षाचे बालपण पुण्यात घालवणाऱ्या लता दीदींचे पुण्याशी नाते अतूट होते. महापालिकेने त्यांचा सन्मान करून हे नाते अधिक दृढ केले. तेव्हाचे महापौर उल्हास ढोले पाटील यांनी दीदींना मानपत्र देऊन सन्मान केला. त्यावेळी नानासाहेब गोरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन,रामकृष्ण मोरे या दिग्गजांसह संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय उपस्थित होते.

Lata Mangeshkar
भारतरत्न लता मंगेशकर कालवश, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

यावेळी मनोगत व्यक्त करताना लता दीदी म्हणाल्या होत्या, की ‘मला शास्त्रीय संगीत गायचे आहे, माझ्या वडिलांची नाट्यगीते स्वरबद्ध करायची आहेत. संत नामदेव, संत एकनाथ, मुक्ताबाई, जनाबाई यांचे अभंग, रामरक्षा सारखी स्तोत्र म्हणावे वाटते. विशेष म्हणजे लहान मुलांना आवडणारी व त्यांच्यावर संस्कार करणारी बालगीते गाणार आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला माझ्या या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा दीदींनी व्यक्त केली होती. त्यावेळी उपस्थित हजारो पुणेकरांनी टाळ्यांचा कडकडाट करून लता दीदींचा संकल्प पूर्ण होण्यास शुभेच्छा दिल्या होत्या. महापालिकेकडे याची नोंद आहे.

दहा वर्षापूर्वी दिला होता स्वरभारस्कर पुरस्कार

महापालिकेला लता दीदींचा दुसरा सन्मान करण्याची २०११ ला मिळाली होती. भारतरत्न भीमसेन जोशी यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे स्मारक म्हणून महापालिकेच्या कै. वसंतराव बागूल उद्यानात पंडित भीमसेन जोशी कलादालन उभारले. तसेच संगीत क्षेत्रातील कलाकारांचा सन्मान करण्यासाठी पंडित भीमसेन जोशी स्वरभारस्कर पुरस्कारही देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

Lata Mangeshkar
पंधरा दिवस 'या' राज्यात सार्वजनिक ठिकाणी वाजणार लतादीदींंची गाणी

पहिला पुरस्कार लता मंगेशकर यांना देण्याचा निर्णय झाल्यानंतर तेव्हाचे महापौर मोहनसिंग राजपाल, नगरसेवक आबा बागूल यांनी मुंबईत जाऊन पुरस्कार स्वीकारावा अशी विनंती केली. दीदींनीही त्यास होकार दर्शविला. त्यानंतर १२ फेब्रुवारी २०११ रोजी प्रसिद्ध कथ्थक नर्तिका सितारादेवी यांच्या हस्ते सहकारनगर बागूल उद्यानात हा पुरस्कार प्रदान केला. त्यावेळी दीदींनी पुणेकरांच्या आग्रहास्तव दीदीनी गायलेले संत ज्ञानेश्‍वर यांचे ‘मोगरा फुलला’ हे गीत ऐकून श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. आबा बागूल यांनी या आठवणीला उजाळा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.