पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची होणार चौकशी

CET cell orders inquiry into engineering colleges in Pune
CET cell orders inquiry into engineering colleges in Pune
Updated on

पुणे : अभियांत्रिकीचे संस्था स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबविताना नियमांना बगल देत गुणवत्तेनुसार प्रवेश केले नसल्याच्या तक्रारी आल्याने पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची चौकशी करण्याचे आदेश सीईटी सेलने दिले आहेत. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

‘सीईटी सेल’ने अभियांत्रिकी प्रवेशासाठी दोन फेऱ्यांनंतर रिक्त जागांवर प्रवेशासाठी संस्था स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे आदेश सीईटी सेलने संस्थांना दिले होते. ३१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी पर्यंत संस्था स्तरावर प्रवेश केले जाणार होते. दरम्यान, पुण्यातील काही महाविद्यालयांनी सीईटी सेलच्या नियमांचे पालन न करता भरती केली आहे, त्यामुळे पालकांनी महाविद्यालयात गोंधळ घातला होता. हा प्रकार समोर आल्याने याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तंत्र शिक्षण विभाग व सीईटी सेलला या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिलेले होते. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये संस्था स्तरावरील प्रवेशात नियमांचे उल्लंघन होत असल्याने अनेक पालकांनी पुणे विभागाच्या तंत्र शिक्षण कार्यालयावर धाव घेतली होती. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करावे असे पत्र काही संघटनांनी सीईटी सेलला होते.

सीईटी सेलच्या आदेशानुसार महाविद्यालयांमधील प्रवेशाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या सदस्यांनी शुक्रवारी (ता. ५) महाविद्यालयांना दिली आहे. मात्र, त्याचा अहवाल अद्याप सादर झालेला नाही.

सीईटी सेलचे आयुक्त चिंतामणी जोशी म्हणाले, ‘‘सीईटी सेलच्या नियमांना डावलून संस्थास्तरावर प्रवेश केले आहेत अशी तक्रार आली होती. त्यानुसार पुण्यातील तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालयास याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीचा अहवाल आल्यानंतर प्रवेश नियंत्रण प्राधिकरणाकडे सादर करून पुढील कारवाई केली जाईल. तसेच इतर सर्व महाविद्यालयांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचाही अहवाल प्राधिकरणाकडे सादर केला जाईल. ज्यांनी नियमांना डावलून प्रवेश केले आहेत ते रद्द होऊ शकतात.
काँग्रेस - शिवसेनेच्या मैत्रीमुळे राष्ट्रवादी नाराज 
महाराष्ट्र नागरिक कृती समितीचे सुरेश जैन व शैलेश बडदे म्हणाले, ‘‘प्रवेश प्रक्रियेत गडबड झाली आहे, त्यामुळे या संस्थांची माहिती मागितली असता ती तंत्र शिक्षण विभागाने दिलेली नाही. सीईटी सेलकडून माहिती मागवून दिली जाईल असे पत्र दिले आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई झाली पाहिजे यासाठी पाठपुरावा केला जाईल.


सहसंचालक कार्यालयाबाहेर बाऊंन्सर
गुरुवारी तंत्र शिक्षण सहसंचालक (Office of the Joint Director of Technical Education)कार्यालयात पालकांनी गर्दी केली होती, त्यामुळे शुक्रवारी कार्यालयाच्या गेटवर बाऊंन्सर तैनात केले होते. कार्यालयात येणाऱ्यांना त्यांच्याकडून चौकशी केली जात होती, त्यावर संघटनांनी व पालकांनी अक्षेप घेऊन सरकारी कार्यालयात बाऊंन्सर कसे काय नेमले असा आक्षेप घेतला. याबाबत सहसंचालक डॉ. दत्तात्रेय जाधव म्हणाले, ‘‘ते सुरक्षा रक्षक महाराष्ट्र तंत्रशिक्षण परिक्षा मंडळाचे आहेत, ते आमच्या कार्यालयाचे नाहीत.’’

पुण्याचे दोन नेते महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.