शिरुरमधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ४७ वर्षांपूर्वीचा बंद पाबळ उपबाजार लवकरच सुरू होणार

Pabal_Market
Pabal_Market
Updated on

शिक्रापूर (पुणे) : पाबळ (ता.शिरूर) येथे ४७ वर्षांपूर्वी नियोजित केलेल्या सव्वा आठ एकरातील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार लवकरच सुरू करणार असल्याची घोषणा सभापती शंकर जांभळकर यांनी केली. दरम्यान पाबळ, केंदूर ते मलठण-कान्हुर मेसाई आणि तालुक्याच्या बेट भागातील शेतकऱ्यांसाठीच या उपबाजाराचा निर्णय घेतल्याचे जांभळकर यांनी सांगितले.

शिरूर बाजार समितीने पाबळ येथे सन १९७३ मध्ये एकूण ८.२० एकरात उपबाजार स्थापन केला. या ठिकाणी पुढील काळात काही गोडावून आणि सेलहॉलचीही उभारणी करून उपबाजाराचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कार्यवाही झाली नाही. याच अनुषंगाने नव्याने सभापतीपदी विराजमान झालेले शंकर जांभळकर यांनी याबाबत पुढाकार घेतला आणि सर्व संचालकांनी त्याला पाठिंबा दिला. त्यानुसार या संपूर्ण बाजार आवाराची पाहणी पाबळ येथील भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण चौधरी, बाजार समिती संचालक प्रवीण चोरडीया, सचिव अनिल ढोकले, व्यावसायिक शौकतभाई इनामदार आदींच्या उपस्थितीत केली.

येथे पुढील काही दिवसात संपूर्ण बाजार आवाराला संरक्षक भिंत, भाजीपाला-तरकारीचे आणि इथे व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी आडतगाळे, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक शौचालय, वाहनांसाठी पार्किंग, रेनवॉटर हार्वेस्टींग, यार्डवर लाईटसाठी सोलर प्लॅन्ट तसेच शेतकऱ्यांसाठी निवासस्थान आणि एटीएम सेंटर आदींच्या उभारणीचे नियोजन करण्यात आले. जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारतींची उपयोगिता पाहणे आणि बाजारासाठी जिल्हा परिषदेचे वतीने रस्त्याच्या नियोजनाची जबाबदारी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांनी घेतल्याचे जांभळकर यांनी सांगितले.

४०० झाडांनी केला श्रीगणेशा

५००० एकरातील खेड एसईझेडचा शेजारीच असलेला परिसर, खेड, शिरुर, शिक्रापूर, मंचर, चाकण आदींच्या मध्यवर्ती असलेल्या पाबळचे भौगोलिक महत्त्व याचा विचार करून पाबळ उपबाजार तात्काळ सुरू करण्यासाठी जांभळकर यांनी नुकतेच बाजार परिसरात ४०० झाडांचे वृक्षारोपण केले. जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे आणि सरपंच पल्लवी डहाळे यांच्या हस्ते हे वृक्षारोपण केल्याची माहिती जांभळकर यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.