Pune-Chakan Crime : चाकणला दोन शाळकरी मुलींना घेऊन रिक्षाचालकाची धूम; चालकासह तीन मुलांना चोप

चालकाला अल्पवयीन मुलींना, मुलांना पोलिसांच्या ताब्यात दिले
chakan crime update two school girl abduction public beat 4 person police
chakan crime update two school girl abduction public beat 4 person policeesakal
Updated on

Chakan Crime : येथे आंबेठाण चौकातून दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना एका रिक्षा चालकाने त्याच्या रिक्षात बसविले. इतर तीनही अल्पवयीन मुले बसवली. त्यानंतर रिक्षा त्याने रोहकल फाटा येथे नेली. तिथे असलेल्या काही तरुणांना हा गैरप्रकार समजला.

त्यानंतर त्या तरुणांनी त्या रिक्षा चालकाला तसेच त्या रिक्षात बसलेल्या तीन अल्पवयीन मुलांना चांगलाच चोप दिला. पोलिसांना ही माहिती देण्यात आली आणि पोलीस ठाण्यात रीक्षा चालकाला तसेच अल्पवयीन मुली तसेच अल्पवयीन मुलांना नेण्यात आले.त्या मुली शाळकरी होत्या. त्या शाळेत जाण्यासाठी निघालेल्या होत्या. या प्रकाराने शहरात एक वेगळीच खळबळ उडाली.

चाकण, ता.खेड येथील आंबेठाण चौकातून एका रिक्षा चालकाने या दोन अल्पवयीन मुलींना( बारा, तेरा वर्षाच्या) रिक्षात शाळेत नेण्याकरता सकाळी बसवून घेतले. त्यानंतर त्या रिक्षात तीन अल्पवयीन मुलेही बसली आणि रिक्षाचालकाने त्यांना रोहकल फाटा परिसरात नेले.

त्या परिसरात असलेल्या काही तरुणांना हा गैरप्रकार दिसला. त्यानंतर त्यांनी चालकाला अल्पवयीन मुलींना, मुलांना पोलिसांच्या ताब्यात दिले.हा प्रकार सकाळी साडेनऊ च्या सुमारास घडला.

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले, की,अल्पवयीन मुली,मुलांना तंबी देऊन सोडले. रिक्षा चालकाला ही पोलिसांनी चोप दिला. ज्या तरुणांच्या लक्षात हा प्रकार आला.त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे हा प्रकार रोखला गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()