Chakan News : चाकणला अतिक्रमणे काढू नका पण रस्ता करा

जागा बघायची पत्र्याची शेड टाकायची आणि त्यातून लाखो रुपये कमवायचे हा काहींचा धंदा आहे. त्या लोकांना अतिक्रमणे नको काढावीत असे वाटत आहे. त्यांच्या मते रस्त्यावरील खड्डे बुजवा वाहतूक आपोआप सुरळीत होईल असे त्यांचे म्हणणे आहे.
chakan traffic encroachment people demand for road pune
chakan traffic encroachment people demand for road puneSakal
Updated on

चाकण : अतिक्रमणे काढू नका पण रस्ता करा, तर अतिक्रमण काढा पण रस्ता झालाच पाहिजे, काढली तर सगळ्यांचीच काढा असे म्हणणारा वर्ग चाकणला आहे. रस्ता नको फक्त खड्डे बुजवा आणि अतिक्रमणे तशीच राहू द्या असाही म्हणणारा वर्ग आहे. अतिक्रमणे करून महिन्याला लाखो रुपये कमावणारा काही वर्ग असल्याने त्यांना अतिक्रमणे काढणे धोक्याचे वाटते आहे.

कारण त्यांच्या मिळणाऱ्या पैशावर मोठी टाच येणार आहे. अतिक्रमणे काढून काही फायदा होणार नाही. वाहतूक कोंडी कमी करायची असेल तर रस्त्यावरल्या रिक्षा हटवा बेकायदा वाहने हटवा, भाजीपाला,पथारीवाले हटवा अशी त्यांची मागणी आहे.जो,तो आपला स्वार्थ बघत आहे आपल्याला किती पैसे मिळतात यावर अतिक्रमणे काढायची न काढायची अशी त्यांची भाषा आहे.

चाकण,ता. खेड येथील औद्योगिक वसाहतीमुळे येथील वाहतूक गेल्या वीस वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महामार्गाचे काम आयआरबी या रस्ते कंपनीने केल्यानंतर त्यानंतर आयआरबी कंपनीच्या ताब्यातून रस्ता गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली गेली. आणि मोठया प्रमाणातील अतिक्रमणाणे अरुंद रस्ते झाले. पुणे- नाशिक महामार्गावर,चाकण- तळेगाव,चाकण -शिक्रापूर,चाकण -आंबेठाण या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत.

जागा बघायची पत्र्याची शेड टाकायची आणि त्यातून लाखो रुपये कमवायचे हा काहींचा धंदा आहे. त्या लोकांना अतिक्रमणे नको काढावीत असे वाटत आहे. त्यांच्या मते रस्त्यावरील खड्डे बुजवा वाहतूक आपोआप सुरळीत होईल असे त्यांचे म्हणणे आहे.

अतिक्रमणे काढली तर काही लोकांचे लाखो रुपये बुडणार आहेत. अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झालेले आहेत त्यातून अवजड वाहने, कंपन्यांची तसेच खाजगी वाहने ये-जा करताना अडचण निर्माण होत आहे.

वाहतूक कोंडी सातत्याने चिंबळी फाटा, मोई फाटा,बर्गे वस्ती फाटा,कुरुळी फाटा, आळंदी फाटा, बंगला वस्ती फाटा मुटकेवाडी फाटा, तळेगाव चौक,आंबेठाण,सावता माळी चौक इथे पाहावयास मिळते. लोकांनी रस्ते अतिक्रमणाने व्यापून टाकलेले आहेत. रस्त्याच्या कडेला काही लोक अतिक्रमणे करून बसले आहेत.

chakan traffic encroachment people demand for road pune
Chakan News : चाकणला वाहतूक विभागाची 'बेकायदा' रिक्षावर कारवाई

अतिक्रमणे करून लाखो रुपये कमवायचे हा धंदा काही लोकांचा आहे. लोक पथारीवाल्यांना आपल्या दुकानासमोर बसून देतात त्यांच्याकडून दर दिवसाला अगदी तीनशे,दोनशे,पाचशे रुपये घेतात. अतिक्रमणे काढणे म्हणजे काहींच्या मते काय फायदा असे वाटते आहे.

काही जणांनी तर अतिक्रमण करून भाजी मंडई थाटली आहे. महिन्याला हजारो रुपये, लाखो रुपये कमवता येतात. काही लोकांना अतिक्रमणे काढावीशी वाटतात तर काही लोकांना अतिक्रमणे अजिबात काढावीशी वाटत नाही ही वस्तुस्थिती आहे. सामान्य माणूस, कामगार यांच्या मते रस्त्यावरील कोणाचीही अतिक्रमणे असो ती राजकीय नेते, कार्यकर्ते अगदी कोणीही असो तर त्याची सरसकट काढली पाहिजेत.रस्ता खुला केला पाहिजे अशी मागणी आहे.

chakan traffic encroachment people demand for road pune
Chakan Traffic : चाकणच्या वाहतूक कोंडीबाबत उपमुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष; अतिक्रमणे काढण्याचे निर्देश

मार्गावर अस्ताव्यस्तपणे रिक्षा लावल्या जातात त्यामध्ये काही स्थानिक लोकांच्या आहेत. त्या रिक्षासाठी वाहनतळ केले पाहिजे त्यांना शिस्त लावली पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्यावर हातगाडीवाले,पथारीवाले इकडे तिकडे बसतात, फिरतात त्यांच्यावर अंकुश लावला पाहिजे.

परिसरात काहीजण हातगाड्या वाल्याकडून दर दिवसाला अगदी तीनशे, दोनशे,पाचशे रुपये गोळा करतात आणि त्यातून मोठा पैसा मिळवतात.सर्व सामान्य माणूस, कामगार, विद्यार्थी, शेतकरी यांच्यामते सर्वांची सरसकट अतिक्रमणे काढली पाहिजेत. कोणाचा दबाव आला तरी सर्वांना न्याय समान दिला पाहिजे.

chakan traffic encroachment people demand for road pune
Chakan Crime : विद्युत रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीतील आठ जणांना अटक

अतिक्रमणाचे रेटकार्ड

चाकण ता. खेड येथील अतिक्रमणे ही रेट कार्डवर आधारित आहेत. त्यांचे रेट ठरलेले आहेत. दुकानासमोर अगदी पथारी वाल्याला, हातगाडी वाल्याला बसवून देतो त्याच्याकडून दिवसाला दोनशे ते तीनशे रुपये घेतो. दुकानासमोर जे बसतात त्यातून रस्ता अडविला जातो. रस्त्या शेजारील सरकारी जागेत काहींनी अतिक्रमण करून पत्रा शेड उभारले आहेत त्यातून एका पत्रा शेड मधून महिन्याला दहा, वीस, तीस हजार रुपये भाडे आकारले जाते.

लाखो रुपये भाड्यातून कमवले जातात. रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून पान टपऱ्या, शेड उभारतात मग त्या पानटपरी चालकांकडून महिन्याला दहा हजार रुपये घेतले जातात. ते घेणाऱ्यांच्या सुद्धा टोळ्या आहेत. काही व्यक्ती कार्यरत आहेत. हप्ता मिळवायचा व त्यातून लाखो रुपये कमवायचे असा काही लोकांचा धंदा आहे. त्यांना अतिक्रमणे काढणे म्हणजे चा धंदा बुडणे असे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.