मराठा चेंबर ऑफ कॅामर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चर उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रांच्या विकासाकरता १९३४ पासून कार्यरत आहे.
पुणे - पुण्याच्या पायाभूत सेवा-सुविधा, सामाजिक सुविधा आणि विकास प्रक्रिया या बाबत राजकीय पक्षांच्या नेत्यांची ध्येय्यधोरणे आणि दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲंड ॲग्रीकल्चरने (एमसीसीआयए) त्यांना एका चर्चासत्रासाठी बुधवारी (ता.१) आमंत्रित केले आहे.
मराठा चेंबर ऑफ कॅामर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चर उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रांच्या विकासाकरता १९३४ पासून कार्यरत आहे. चेंबरने पुणे आणि महाराष्ट्रातील इतर विभागांच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पुण्यामघ्ये उद्योगांच्या वाढीसाठी पूरक अशा संस्थांची उभारणी आणि विविध शासकीय विभागांची कार्यालये पुणे शहरात स्थापन होण्यात चेंबरने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पुणे हे गुंतवणुकीसाठी आकर्षक केंद्र म्हणून देशविदेशात प्रसार करण्यात चेंबर अग्रणी राहीले आहे. तसेच पुण्यात पायाभूत सेवांचा विकास व्हावा यासाठीही चेंबर प्रयत्नशील आहे. उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रांशी निगडीत विषयांसोबतच पुण्याच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित विविध बाबींमध्ये मराठा चेंबरने कायमच सक्रिय भूमिका बजावली आहे. पुण्यातील मूलभूत पायाभूत आणि सामाजिक सुविधा अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या रोजगाराच्या संधी टिकविणे, नव्याने रोजगार निर्माण करणे हे महत्त्वाचे आहे. यासाठीच राजकीय नेत्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे चेंबरचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी म्हटले आहे.
मत पाहिजे, विमानतळ द्या !
पुणेकरांचे मत हवं असेल तर, पुण्याचा हक्काचा विमानतळ द्या, असे म्हणत या बाबतचे कॅंपेन सोशल मीडियावर सुरू झाले आहे. ‘पर्सिस्टंट’चे आनंद देशपांडे यांनी या बाबत ट्विटरवर ट्विट करताना, पुण्यासारख्या उद्योग, शिक्षण, आरोग्य, आयटी आदी विविध क्षेत्रांत विस्तारणाऱ्या शहराला आंतरराष्ट्रीय विमानतळ अजून मिळालेला नाही, याकडे लक्ष वेधले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.