Chandani Chowk Bridge Demolished : इंजिनिअर्सचा अंदाज चुकला! PWDनं केलं होतं मजबूत काम

ज्या कंपनीला पूल पाडण्याचं काम देण्यात आलं आहे. या कंपनीच्या अभियंत्यांनी स्पष्टचं सांगितलं
Chandani Chowk Bridge Domolished
Chandani Chowk Bridge Domolished
Updated on

पुण्यातील चांदणी चौकात वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरणारा पूल पाडण्याचं काम अखेर पार पडलं. पण जेव्हा पूल पाडण्यासाठी स्फोट घडवण्यात आला, तेव्हा तो संपूर्णपणे जमीनदोस्त झाला नाही. याचं कारण हा पूल पाडण्याचं काम दिलेल्या कंपनीच्या प्रमुख अभियंत्यांनी स्पष्ट केलं आहे. (Chandani Chowk Bridge Demolished Engineers guessed wrong PWD had done a strong job)

"आमचा अंदाज होता त्यापेक्षा जास्त स्टील या पूलाच्या बांधकामावेळी वापरण्यात आलं होतं. हे स्टील दोन्ही बाजूंनी असलेल्या दगडांमध्ये फिक्स करण्यात आल्यानं स्टीलचं हे स्ट्रक्चर स्फोटानंतर पूर्णपणे खाली आलं नाही," असं एडिफाईज कंपनीचे मुख्य अभियंते आनंद शर्मा यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. हा ३० मीटर लांबीचा पूल पाडण्याचं काम एडिफाईज कंपनीला देण्यात आलं आहे.

Chandani Chowk Bridge Domolished
Chandani Chowk Bridge Demolished : स्फोटकं वापरुनही पूल जमीनदोस्त झालाच नाही.. कारण फक्त एकच!

कंपनीच्या या स्पष्टीकरणामुळं एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे की, ज्यावेळी सन १९९२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागानं हा पूल बांधला त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे हे काम केलं आहे. त्यामुळेच हा पूल अत्यंत मजबूत असा बनला होता. कारण आज सुमारे १३०० स्फोटकं वापरुन स्फोट केल्यानंतरही तो पूर्णपणे खाली कोसळला नाही.

पूलाखालून आधी होती सिंगल लेन

या पूलाखालून जाणारी वाहतूक ही आधी सिंगल लेन होती. सन २००७ पासून विशेषतः हिंजवडी आयटी पार्क झाल्यापासून या मार्गावरील वर्दळ वाढली, अशी माहिती या भागात पान टपरी चालवणाऱ्या एका व्यावसायिकानं दिली. गेल्या 27 वर्षांपासून ते या भागात पान टपरी चालवत आहेत.

पूल बांधणाऱ्यांना पुण्यातील रस्त्यांची कंत्राटं द्या

खास बाब म्हणजे ज्याने कोणी हा पूल बांधला त्याला पुण्यातील रस्त्यांचे कंत्राट द्या, अशी मागणी भुसारी कॉलनी इथं राहणाऱ्या एका रहिवाशानं दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.