Chandani Chowk Inauguration: पुण्यात बस, मेट्रोला जोडणारं 'वन कार्ड' सुरु करा; फडणवीसांच्या सूचना

चांदणी चौकातील लोकार्पण सोहळ्यात पुण्यातील वाहतूक व्यवस्थेच्या सुविधेबाबत फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली.
devendra fadnavis
devendra fadnavis Sakal
Updated on

मेट्रो, बससह पुण्याशी जोडणाऱ्या या सर्व ट्रान्सपोर्ट सिस्टिम्सना 'वन कार्ड' योजनेनं जोडण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. महा मेट्रोचे एमडी श्रावण हार्डिकर यांच्यासह पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला तशा सूचना केल्या आहेत.(Chandani Chowk inauguration One Card for Pune Transport Devendra Fadnavs Instructions to Metro officials)

devendra fadnavis
Chandni Chowk Flyover : "...आम्ही काय बेअक्कल आहेत का?"; पुण्यातील कार्यक्रमात अजित पवार संतापले!

फडणवीस नेमकं काय म्हणाले?

पुण्याच्या मेट्रोला पहिल्यांदा मंजुरी मिळाली त्यानंतर नागपूरची झाली. पण नागपूरची पूर्ण झाली. आमची नितीन गडकरींसोबत बैठक झाल्यानंतर पुणे मेट्रोच्या कामानं वेग घेतला. त्यानंतर पुणे मेट्रोमध्ये इंटरचेंजचं काम झाल्यामुळं पुणे मेट्रोत आता केवळ वाढदिवस साजरे होत नाहीत तर लोक प्रवासही करायला लागले आहेत. (Latest Marathi News)

पण आता वनकार्ड सुरु झाल्यामुळं त्याचा देखील प्रवाशांना फायदा होईल. श्रावण हार्डिकरांना माझी सूचना आहे. तसेच पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमपीएम यांनाही माझी सूचना आहे की हे जे वनकार्ड आपण काढलं आहे ते पीएमपीच्या बसला देखील लागू होईल, अशा प्रकारचं हे वनकार्ड झालं पाहिजे. म्हणजे आता या वनकार्डवर आपली मेट्रो आणि बस सिस्टिम एकत्रित चालली पाहिजे, असं फडणवीस यावेळी म्हणाले. (Marathi Tajya Batmya)

devendra fadnavis
Chandni Chowk Inauguration: "नेता असावा तर नितीन गडकरींसारखा, सर्व सोंग करता येतात पण..."; अजित पवारांनी केले कौतुक

वन कार्डची संकल्पना काय?

मोदींच्या मते वनकार्ड हे केवळ पुणे मेट्रोसाठी नाही तर पुण्यातल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबरोबरच या कार्डवर देशभरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण आणतो आहोत. पुढच्या काळात मुंबईला गेलो तरी पुण्याचं कार्ड दाखवून मुंबईच्या मेट्रोत प्रवास करता येईल, असं हे वनकार्ड आहे. त्यामुळं ही चांगली सुरुवात झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.