Chandni Chowk Bridge : चांदणी चौकातील पाडलेल्या पुलाचा ढिगारा हटवण्याचं काम सुरु; वाहतूक अजूनही बंदच

महामार्गावरील वाहतूक सुरू होण्यास 10 वाजेपर्यंत विलंब होण्याची शक्यता
pune
punesakal
Updated on

पुणे : चांदणी चौकातील पूल पाडलेल्या ठिकाणी राडाराडा काढण्याचे काम सध्या सुरू असून अजूनही दहा ते पंधरा टक्के राडारोडा जागेवर आहे. त्यामुळे राडारोडा काढण्यास विलंब होत आहे. त्यामुळे माहामार्गवरून वाहतूक सुरू करण्यास होण्यास किमान सकाळी 10 वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनांना पर्यायी मार्गाने, शहरातील रस्त्यावरून पुढे जावे लागणार आहे.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चांदणी चौकातील एन डी ए रस्ता - बावधन पुल पाडण्याचे नियोजन करण्यात आले होते. 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एक वाजता पुल पाडण्यात आला. दरम्यान रात्री 1 वाजून 20 मिनिटांनी पुलाचा राडारोडा काढण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र राडारोडा कठीण असल्याने रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत तो काढणे अद्याप शक्य झाले नसल्याची सद्यस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाने रविवारी सकाळी 8 वाजता महामार्गावरील वाहतूक सुरू करण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे अवजड वाहतूकीसह हलक्या वाहना हि मोठा वळसा घालून जावा लागणार आहे.

सध्या मुंबईहून पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक उर्से टोल नाका येथे, तर साताऱ्याहून मुंबईला जाणारी वाहतूक खेड शिवापूर येथे थांबविण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणाहून सध्या हलक्या वाहनांना शहरातून पुढे जाण्यास मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. दरम्यान, पुलाचा राडारोडा काढण्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून 20 टक्के काम अजून शिल्लक आहे. त्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याची नियोजित 8 वाजताची वेळ पूर्ण होणार नसल्याची सद्यस्थिती आहे. त्यामुळे वाहनचालकांना 10 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने जावे लागणार आहे.

पर्यायी मार्ग असा

1) मुंबईकडून सातारा, कोल्हापूर येठे जाण्यासाठी

संबंधित वाहनांनी उर्से टोल नाका येथून जुना मुंबई पुणे महामार्ग किंवा रावेत, वाकड, बाणेर, औंध, शिवाजीनगर, डेक्कन, टिळक रस्ता, स्वारगेट मार्गे पुढे जाता येणार आहे.

2) सातारा, कोल्हापूर येथून मुंबईकदे जाणाऱ्या वाहनांनी कात्रज, स्वारगेट, टिळक रस्ता येथून किंवा धायरी, सिंहगड रस्ता, नळ स्टॉप, विधी महाविद्यालय रस्ता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून औंध, वाकड मार्गे पुढे जावे लागणार आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.