Pune Accident : चांदणी चौकात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला अपघात; 6 विद्यार्थी जखमी

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी रिक्षा रस्त्यावर उभ्या असलेल्या डम्परला धडकून सहा विद्यार्थी जखमी झाले.
chandni chowk student auto rickshaw accident 6 injured police doctor hospital traffic
chandni chowk student auto rickshaw accident 6 injured police doctor hospital trafficSakal
Updated on

Kothrud News : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी रिक्षा रस्त्यावर उभ्या असलेल्या डम्परला धडकून रिक्षा चालक व सहा विद्यार्थी जखमी झाले. यातील दोन विद्यार्थी गंभीर जखमी असून बाकीचे चार विद्यार्थी वैद्यकीय तज्ञांच्या देखरेखीत आहेत.

संदीप भोंडवे म्हणाले की, एनडीए (चांदणी ) चौक आता वाहतूक कोंडीच नव्हे तर रोजच्या अपघातासाठी ओळखला जायला लागला आहे. जड वाहने विशेषतः डम्पर मुळे होणा-या अपघातांचे प्रमाण जास्त आहे.

वाहने कुठे उभी करावीत, किती वेगाने चालवावीत याबाबत कुठलाही अंकुश वा नियम पाळले जात नसल्याने निष्पाप जीवांचा बळी जात आहे. वाहतूक पोलिस, महामार्ग प्राधिकरण यांना याबाबत जबाबदारी टाळता येणार नाही.

chandni chowk student auto rickshaw accident 6 injured police doctor hospital traffic
Pune School Bus Accident : पुण्यात स्कूल बसचा भीषण अपघात! सीसीटीव्ही फुटेज आलं समोर; चालकावर गुन्हा दाखल

एशियन हॉस्पिटलचे डॉ. आशिष जाधव म्हणाले की, सार्थक सुभेदार व रीद्दी दिनेश दाभाडे हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.सार्थक सुपेकर, चिन्मय आरोळेकर, राजवीर फुले, आकांक्षा भोसले या मुलांवर प्राथमिक उपचार केलेले आहेत. ही सर्व मुले सात ते आठ वयोगटातील आहेत. रिक्षाचालकाचे कपडे रक्ताने माखले होते. परंतु तशाही अवस्थेत तो सर्व मुलांना उपचार मिळावे यासाठी धडपड करत होता.

रिक्षाचालक नामदेव काशिनाथ गोळे, वय ५९ म्हणाले की, चांदणी चौकातून भूगावच्या दिशेने मुलांना सोडायला निघालो होतो. वळणावर डाव्या बाजूला असलेल्या डम्परला रिक्षा धडकली. त्यात माझी मुले व मी जखमी झालो. ताबडतोब मुलांना दवाखान्यात दाखल केले. घडलेली घटना धक्कादायक आहे.

chandni chowk student auto rickshaw accident 6 injured police doctor hospital traffic
Pune School Bus Accident : शाळेवरही पोलिसांनी कारवाई करावी; पालकांची मागणी

हेल्थ रायडरचे प्रशांत कनोजिया म्हणाले की, विद्यार्थी वाहतूक हा नाजुक विषय आहे. तर डम्पर वाहतूक हा गंभीर विषय आहे. यातील अनियमितता असणा-यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. बावधन वाहतूक पोलिसांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे या घटनेची कोणतीही माहिती नव्हती. माहिती घेवून सांगतो असे येथील पोलिसांनी कळवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()