Kasba Peth Bypoll Election : चंद्रकांत पाटलांनी पोटनिवडणुकीसाठी बोलवली बैठक; भाजपचा उमेदवार आज ठरणार?

कसबा बिनविरोध नाहीच! पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस अ‍ॅक्शन मोडमध्ये
Kasba Peth Bypoll Election
Kasba Peth Bypoll ElectionEsakal
Updated on

पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या. 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या पोटनिवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या जागेवर भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा आहे.

सध्या पोटनिवडणूकीसाठी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवाय मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळकांनी देखील घरातच उमेदवारी देण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. शैलेश टिळक राजकारणात फारसे सक्रिय नाहीत त्यामुळे मुक्ता टिळकांचा मुलगा कुणाल टिळकची सध्या चर्चा रंगली आहे.

Kasba Peth Bypoll Election
Kasba Peth Bypoll Election : कसब्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी, पक्षश्रेष्ठींचीं डोकेदुखी वाढणार

मुक्ता टिळक यांच्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची यासंबधी आज भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यामध्ये महत्वाची बैठक बोलावली आहे. पुण्यातील भाजपचे प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये भाजपकडून पोटनिवडणुकीसाठी रणनीती आखण्यात येईल. त्याचबरोबर या बैठकीत कोणती नावे चर्चेत आहेत याबद्दलही चर्चा आणि तया नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Kasba Peth Bypoll Election
Kasba Peth Bypoll Election : कसब्यात काँग्रेसचे उमेदवार ठरले! नाना पटोले नावं हायकमांडला पाठवणार

पुण्यात रिक्त झालेल्या विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोट निवडणूक होणार आहे.

दरम्यान कसबा पेठ पोटनिवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादीही लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही निवडणूक चुरशीची होणार असून परेक पक्ष या निवडणुकीसाठी कंबर कसून प्रयत्न करत आहे.

Kasba Peth Bypoll Election
Kasba Peth Bypoll Election : कसबा बिनविरोध नाहीच! पोटनिवडणुकीसाठी काँग्रेससह, राष्ट्रवादीही रिंगणात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.