'मोदी जे म्हणतात तेच करतात, देशवासियांचा त्यांच्यावर विश्वास'

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
Updated on

पुणे : ''राजकारणाची पातळी खालवली आहे, या देशात काही परंपरा आहेत, एखाद्या माणसांच्या भावनांची चेष्टा करायची, मोदींना त्याचा काही फरक पडत नाही, एखाद्या माणसाला मनापासून दुःख झालं त्याची चेष्टा करायची ? पंतप्रधान मोदीं काम करत राहतात, टीकेकडे लक्ष देत नाहीपण''अशा असे सांगताना भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील भावूक झाले.

देशात कोरोनाची दुसऱ्या लाटेत मोठी जिवीतहाणी झाली आहे. तसेच देशात दुसऱया लाटेत आतापर्यंत ४२० डॉक्टारांना जीव गमवावा लागल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना तौक्ते वादळाने देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर मोठे नुकसान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी वाराणसीतील (Varanasi) डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी भावूक झाले होते. व्हिडिओ कॉन्फरन्समधला मोदींचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चंद्रकांत पाटील
'दिलीप कुमारांसारखा भावनिक अभिनय कोणाला येत नाही वाटायचं'

''उध्दव ठाकरेंनी 2 दिवसात पंचनामे करून मदत जाहीर करण्याचे सांगितले मात्र, 2 दिवसात पंचनामे होण्यासाठी त्यांनी 3 दिवस जायला हवं होतं''अशी टीकाही चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक चंद्रकांत पाटलांनी केले. ''शरद पवार हे आमचे राजकीयदृष्ट्या कितीही विरोधक असले तरी लातूर भूकंपाच्या वेळी त्यांनी लातूरला आपलं हेडक्वॉर्टर केलं होतं आणि परिस्थिती आटोक्यात आणली होती. त्याचप्रमाणे, मुख्यमंत्र्यांनी ही कोकणात राहावं. तुमच्या तब्येतीला प्रॉब्लेम असेल तर, तंबूत नका राहू पण तिथे रहा.'' अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरें यांना टोला लगावला आहे. ''उद्धव ठाकरे माझे दुष्मन नाहीत. आठ दिवस जाऊन त्यांनी तिथे राहावे. वातावरण तिकडे चांगलं आहे, हातात काठी घेतल्याशिवाय प्रशासन काम करत नाही.''असेही ते पुढे म्हणाले.

यावेळी बोलताना पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टोला लगावला.''आता महाराष्ट्रात संजय राऊत नंतर अजित पवारांना विचारण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे, मात्र ''सो चुहे खाकर बिल्ली चली हज को.'' आपल्या पायाशी काय जळतय ते पाहा असा अजित पवारांना चंद्रकांत पाटलांचा टोला दिला. तसेच अजित पवारांनी उद्धव ठाकरेंनाही सल्ला द्यावा 3 तासात पाहणी होत नाही, अजित दादांनी आठ दिवस कोकणात जावे आणि त्यांच्या स्टाईलने पंचनामे करून घ्यावेत.'' असा सल्लाही यावेळी दिला.

चंद्रकांत पाटील
लहानेंनी सांगितलं, म्युकरमायकोसिस होण्यामागचं नेमकं कारण

विधान परिषदेच्या 12 जागांच्या नियूक्तीबाबत मुंबई उच्चन्यायालयाने विचारलेल्या प्रश्नाबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना प्रश्न विचाराला आहे. त्यावर संजय राऊत यांनी, ''राज्यापालांनी केलेल्या शिफारसी स्वीकारणे राज्यपालांना बंधनकारक आहे. मात्र, राज्यपाल निर्णय घेत नाही. राज्यापालांनी आम्हाला कोर्टात जायाला भाग पाडू नये'' असा इशारा दिला होता. संजय राऊतांच्या या वक्तव्याबाबत चंद्रकांत पाटलांना विचारले असता, ते म्हणाले ''संजय राऊत काहीही म्हणू शकतात, ते फारच मोठे विद्वान आहेत, हा विषय कोर्टात सुरु आहे, त्यावर मी बोलू शकणार नाही.''

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी, ''देशात लसीकरण सुरू करताना व्हॅक्सिनचा उपलब्ध स्टॉक आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईन्स याकडे लक्ष दिलं गेलं नाही. स्टॉक नसल्याचं माहीत असूनही लसीकरण मोहीम राबवण्यात आली,'' अशी केंद्र सरकारवर केली.याबाबत विचारले असता, चंद्रकांत पाटील म्हणाले, ''कोण अधिकारी, कोण सुरेश जाधव मी नाही ओळखत. मला फक्त मोदीं माहिती आहेत आणि मोदी जे म्हणतात ते करतात. त्यांनी डिसेंबरपर्यंत नियोजन केलं आहे, याचं प्रोडक्टशन कसं वाढेल त्याला सप्टेंबरपासून वेग मिळेल.'डिसेंबरपर्यंत देशाची गरज आपण पूर्ण करू' हे मोदी म्हणतात त्यावर देशातील नागरिकांचा विश्वास आहे.''

''पुणे महापालिकेच्या हातात लस नाही. लसीकरणाला लोकं पैसे देतील मात्र, विकत कुठून घ्यायचं? खाजगी हॉस्पिटलला आम्ही आवाहन करतो, आम्ही लोकांचे पैसे देतो.''अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. तसेच पुणे महापालिकेने आणखी एक 200 बेड्सचे हॉस्पिटल सुरू करण्याची तयारी केली, त्याला मी एक कोटींचा निधी दिलाय, आठ दिवसात सुरू होणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.