Chandrakant Patil : डोळ्यावरील शाइफेक घटनेच्या कोणत्या चौकटीत बसते - चंद्रकांत पाटील

लोकशाही पद्धतीने निषेध नोंदवण्यास माझा कोणताही विरोध नव्हता
Chandrakant Patil criticize over ink on face incident pune democrasy politics
Chandrakant Patil criticize over ink on face incident pune democrasy politics sakal
Updated on

पुणे : लोकशाही पद्धतीने निषेध नोंदवण्यास माझा कोणताही विरोध नव्हता. मात्र ज्या पद्धतीने हल्लेखोरानी माझ्यावर शाही फेक केली ती डॉ. आंबेडकर यांच्या घटनेला धरून नव्हती. मी दिलगिरी व्यक्त करूनही हा भ्याड हल्ला झाला. ही बाब घटनेच्या कोणत्या चौकटीत बसते असे मत उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या संमेलनाच्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, “हा हल्ला नियोजित होता. पडद्याआडुन कट रचणारे हल्ले सापडले आहेत. माझ्या मनात डॉ बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा जोतिबा फुले यांच्याबाबद्दल कोणताही अनादर नाही. तरीही कोणाचे मन दुखावले असेल तर त्याची मी मोठ्या मनाने दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र हा भ्याड हल्ला ठरवून केला.

पाटील एका स्पर्धा परीक्षेच्या संमेलनाला उपस्थित आज राहिले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केले. विद्यार्थी मित्रांच्या आलेल्या मागण्यांचा ही विचार करू असे म्हणत संमेलनात त्यांनी विद्यार्थ्यांना आश्वासित केले. संमेलनामध्ये बोलताना पाटील म्हणले, “कॉलेज वयातील निवडणुकीचे किस्से सांगितले. कॉलेज वयात खूप चुरशीची आणि हाणामाऱ्या होणाऱ्या निवडणुका पहिल्या त्यामुळे कालची शाइफेक तर काहीच नाही असे म्हणत कालच्या भ्याड शाइफेकचा माझ्यावर कोणताही परिमाण झाला नाही असे पाटील यांनी सांगितले यावेळी शिवसेनेच्या सुषमा अंधारे याही उपस्थित होत्या यावेळी पाटील यांनी अंधारे यांच्या विषयी बोलताना सुषमा अंधारे दिवसातून पाच ते सहा वेळा टीव्हीवर दिसतात व त्यांचा प्रवास अंधारातून प्रकाश कडे होत आहे असा टोला हाणला .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.