''पवारसाहेब गॉडफादर, सरकारवर कंट्रोल तरी आरक्षण का नाही''

sharad pawar nd chandrakant patil
sharad pawar nd chandrakant patil
Updated on

पुणे : ओबीसी आरक्षण(OBC Reservation) आणि मराठा आरक्षणाच्या(Maratha Reservation) मुद्द्यावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(sharad Pawar) यांना जबाबदार धरलं. ''पवार साहेब सगळ्यांचे गॉड फादर आहेत. वैचारिक मार्गदर्शक आहेत. स्वतःच्या पक्षावर आणि महाविकास आघाडीवर त्यांचा कंट्रोल आहे, मग तरी आरक्षण का मिळाले नाही? म्हणून त्यांच्याकडे दोष जातो,''असे म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पडळकरांच्या वक्तव्याचे समर्थन केलं. (Chandrakant Patil Criticizes Sharad Pawar On Reservations issue)

ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपकडून सातत्याने राज्यातील ठाकरे सराकरवर निशाना साधला जात आहे. आता विरोधकांकडून आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांना लक्ष्य केले जात आहे.

''सुप्रीम कोर्टाचा मराठा आरक्षणाचा निकाल मी मराठीत करून घेतला तेव्हा, पानापानावर जाणवतंय की किती दिरंगाई, बेफिकिरी आहेत. तेच ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत झालंय. देवेंद्र फडणवीस यांनी ऑर्डीनन्स काढून ओबीसींचे राजकीय आरक्षण तात्पुरते टिकवले नंतर सरकार गेलं. ऑर्डीनन्सचा कायदा तुम्ही करायला हवा ना? हा दोष कोणाचा? ''असा सवालही शरद पवारांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.

Chandrkant Patil
Chandrkant Patil
sharad pawar nd chandrakant patil
ओबीसी आरक्षणासाठी पुण्यात भाजपाचे 'आक्रोश आंदोलन
Devendra Fadanvis
Devendra FadanvisEsakal

देवेंद्र फडणवीस यांनी 31 मेला शरद पवारांची भेट घेतली तर 1 जुनला जळगावमध्ये खासदार रक्षा खडसे यांना भेटले. देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळेंना विनंती करुन शरद पवार यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी भेट घेतली होती.तर जळगाव जिल्ह्यात केळीबागांचं मोठं नुकसान झाले त्यासाठी देवेंद्र फडणवीस खासदार रक्षा खडसे यांना भेटले होते.

दरम्यान याबाबत विचारले असता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, ''भाजपचा संघर्ष कधीच संपला आहे. भेटी-गाठीचा संदर्भ वेगळा आहे. शरद पवारांची भेट तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होती. दुष्मन असले तरी भेटायला जातात ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. नाथाभाऊंच्या घरी तर भाजपाचे खासदार आहे''

Sharad Pawar
Sharad Pawar
sharad pawar nd chandrakant patil
खाद्यतेलाचे भाव दोनशे रुपयांनी उतरले; मागणीत घट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.