Chandrasekhar Bawankule : युवाशक्तीने राजकारणात आले पाहिजे - चंद्रशेखर बावनकुळे

'महिला आणि युवकांनी राजकारणात का यावे' या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात बावनकुळे बोलत होते.
Chandrasekhar Bawankule
Chandrasekhar Bawankulesakal
Updated on

डोर्लेवाडी : युवाशक्तीने देशाच्या व राज्याच्या राजकारणात खूप ताकदीने पुढे आले पाहिजे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न मार्गी लावले तर, तरुणांनो राजकारणात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.यामध्ये आपल्याला पुढे येण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

झारगडवाडी (ता. बारामती) येथे 'महिला आणि युवकांनी राजकारणात का यावे' या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात बावनकुळे बोलत होते.यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल,मुरलीधर मोहोळ, जेष्ठ नेते बाळासाहेब गावडे, रंजन तावरे,दिलीप खैरे, पांडुरंग कचरे, आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित असलेल्या तरुण-तरुणींनी विचारलेल्या प्रश्नांना बावनकुळे यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. ते पुढे म्हणाले, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पूर्वीपासूनच घराणेशाही चालत आलेली आहे.

दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू पासून ते राहुल गांधी यांच्यापर्यंत तो वारसा चालत आलेला आहे. मात्र भाजपमध्ये घराणेशाहीला थारा दिला जात नाही. म्हणूनच सर्वसामान्य कुटुंबात असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल द्रौपदी मुर्मू , केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व माझ्या सारखा बुथवर काम करणारा शेवटचा कार्यकर्ता राज्याचा अध्यक्ष होतो, हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

Chandrasekhar Bawankule
Uddhav Thackeray : काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत चौकशी करा; उद्धव ठाकरे यांचे सरकारला आव्हान

तरुणांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी कोणत्या नेत्याच्या मागे फिरण्याची गरज नाही त्यामुळे स्वतःला मोठे होता येत नाही. राजकारणात यायचं असेल तर योग्य पक्षाची निवड करावी, पक्षाची विचारधारा पहावी.

पक्षाने दिलेल्या संधीच्या आधारावर समाजात आपल्याला योग्य स्थान निर्माण करता येते. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपण जर प्रामाणिक काम केले तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आपल्याला पद मिळते.

भाजप-शिवसेना सरकारने थेट सरपंच पदाचा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्थेत पन्नास टक्के आरक्षण असल्यामुळे राज्यात एक लाख २५ हजार महिलांना राजकारणात काम करण्याची संधी मिळाली.

Chandrasekhar Bawankule
Chandrasekhar Bawankule : "डबल इंजिन सरकारमध्ये डबे जोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील"

इतर संस्थांमध्येही ३०% महिलांना संधी देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करीत आहे. मात्र संधी मिळाल्यानंतर नेतृत्व सिद्ध करण्याची जबाबदारी महिलांची आहे. आपण जर सातत्य ठेवले तर महिलांना राजकारणात पुढे जायला कोणीही रोखू शकत नाही.

राजकारणात कोणीही परिपूर्ण नाही. जय-पराजय हे होतच असतात. अमेठीत गांधी परिवाराला देखील पराभव पत्करावा लागला. त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या एकदा अपयश आल्यानंतर निराश न होता पुन्हा प्रयत्न केल्यामुळे निवडून आल्या.

Chandrasekhar Bawankule
Chandrasekhar Bawankule : यवतमाळ : कमळाच्या एकामताने देशात परिवर्तन घडवून आणले - चंद्रशेखर बावनकुळे

पराभवानंतर खचून न जाता लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन हृदयात स्थान निर्माण करून पुन्हा विजय होता येते हे त्यांनी विजय मिळवून दाखवून दिले आहे. पराजय झाला तरी संविधानाने आपल्याला एवढी ताकद दिली आहे की, संघर्ष करून पद नसतानाही आपण सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू शकतो.

त्यांच्या मागे उभे राहिलात तर जनता तुम्हाला कधीच विसरत नाही. असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध संस्था व संघटनांचा बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रदेश कार्यकारणी सदस्य मच्छिन्द्र टिंगरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.