चांदणी चौकातील पुल पाडण्याच्या कामामुळे वाहतुकीत बदल

चांदणी चौकातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी आता एनडीए-बावधनला जोडणारा जुना पुल रविवारी (ता.2) पहाटेच्या सुमारास पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Chandani Chowk Pune
Chandani Chowk PuneSakal
Updated on
Summary

चांदणी चौकातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी आता एनडीए-बावधनला जोडणारा जुना पुल रविवारी (ता.2) पहाटेच्या सुमारास पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पुणे - चांदणी चौकातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी आता एनडीए-बावधनला जोडणारा जुना पुल रविवारी (ता.2) पहाटेच्या सुमारास पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी (ता.11) रात्री अकरा वाजल्यापासून ते रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत महामार्गावरील वाहतुक बंद करण्यात येणार आहे. त्यावेळी संबंधित मार्गावरील वाहतुक ठिकठिकाणाहून वळविण्यात येणार असून वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

चांदणी चौक येथील पुल पाडण्यापुर्वी शनिवारी (ता. 1) रोजी रात्री अकरा वाजल्यापासून वाहतुक बंद करुन रविवारी (ता.2) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पुल पाडण्यात येणार आहे. शनिवारी (ता.11) रात्री अकरा वाजल्यापासून ते रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत महामार्गावरील वाहतुक बंद करण्यात येणार आहे. राडारोडा उचलल्यानंतर सकाळी आठ वाजल्यापासून महामार्गावरील वाहतुक सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान, अवजड वाहने शहराच्या बाहेर दोन्ही बाजूस (मुंबई बाजू व सातारा बाजू) थांबवावी लागणार आहेत. व इतर वाहनांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे

- पर्याय क्रमांक 1 - मुंबईकडून येणारी वाहतूक रावेत, रावेत औंध रस्ता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौक, संचेती रुग्णालयासमोरील चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, स्वारगेट येथील जेधे चौक, कात्रज चौक, नवले पुल, नवीन बोगदा मार्गे बेंगलोर कडे वळविण्यात येईल. त्यापैकी काही वाहतूक कात्रज जंक्‍शन पासून जुन्या बोगद्यातून साताऱ्याकडे वळविण्यात येईल.

- पर्याय क्रमांक 2 - मुंबईकडून येणारी वाहतूक बाणेर पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौक, संचेती रुग्णालयासमोरील चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, स्वारगेट येथील जेधे चौक, कात्रज चौक, नवले पुल, नवीन बोगदा मार्गे बेंगलोरकडे वळविण्यात येईल.

बेंगलोरकडून मुंबईकडे येणारी वाहतूक खालील प्रमाणे वळविण्यात येईल.

- पर्याय क्रमांक 1 - नवीन कात्रज बोगदा, नऱ्हे, वडगाव, सिंहगड रस्ता, राजाराम पुल, डिपी रस्ता, नळस्टॉप, एसएनडीटी कॉलेज, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, विद्यापीठ चौक, पाषाण रस्ता (भाग) बाणेर रस्ता ऑर्किड हॉटेल मार्गे मुंबईकडे जाण्यासाठी महामार्गावर येता येईल.

- पर्याय क्रमांक 2 - नवीनन कात्रज बोगदा, नऱ्हे, नवले पुल, वडगाव पुल, वारजे, कर्वे रस्ता, एसएनडीटी कॉलेज, विधी महाविद्यालय रस्ता, विद्यापीठ चौक, पाषाण रस्ता, पाषाण सुस रस्ता, बाणेर मार्गे मुंबई महामार्गाकडे जाता येईल.

- पर्याय क्रमांक 3 - नवीन कात्रज बोगदा, नऱ्हे, नवले पुल, वडगाव पुल, वारजे, कर्वे रस्ता, एसएनडीटी कॉलेज, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौक, औंध, रावेत रस्ता, रावेत मार्गे मुंबई महामार्गाच्या दिशेने जाता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.