Pune Porsche Accident: ...अन् बदलला अल्पवयीन गुन्ह्याचा कायदा; पोर्शे प्रकरणात फडणवीसांनी दिला निर्भया केसचा संदर्भ

पुण्यातील उच्चभ्रू भाग असलेल्या कल्याणीनगरमध्ये भरधाव वेगात असलेल्या आलिशान पोर्शे कारनं उडवल्यानं दुचाकीवरील एक तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal
Updated on

मुंबई : पुण्यातील उच्चभ्रू भाग असलेल्या कल्याणीनगरमध्ये भरधाव वेगात असलेल्या आलिशान पोर्शे कारनं उडवल्यानं दुचाकीवरील एक तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणामुळं राज्यातील वातावरण अक्षरश: ढवळून निघालं आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी जी काही कार्यवाही केली त्याबद्दल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पोलीस आयुक्तालयात सविस्तर माहिती दिली. या घटनेतील प्रमुख आरोपी हा अल्पवयीन असल्यानं फडणवीसांनी आपल्या निवेदनात थेट निर्भया प्रकरणाचा संदर्भ दिला. (Changed juvenile act Devendra Fadnavis referred to Nirbhaya case in Pune Porsche Accident case)

Devendra Fadnavis
तुमच्यात 'इडियट'ची लक्षणं आहेत का? काय आहे 'हा' सिन्ड्रोम

फडणवीस काय म्हणाले?

पुण्यातील पोर्शे कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला ज्युवेनाईल जस्टीस बोर्डानं जामीन मंजूर केला. पोलिसांनी केस दाखल करताना कोर्टात त्याचं वय १७ वर्षे ८ महिने इतकं सांगितलं. तसेच त्याच्यावर ३०४ कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं जेव्हा दिल्लीमध्ये निर्भया प्रकरण घडलं होतं. त्यामध्येही एक अल्पवयीन आरोपी होता, त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर देशातील अल्पवयीन गुन्ह्याच्या कायद्यात बदल झाला. त्यानुसार अल्पवयीन आरोपीनं जर भयंकर गुन्हा केला असेल त्याच्यावर प्रौढ गुन्हेगाराप्रमाणं खटला चालवून शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याप्रमाणं या प्रकरणातही पावलं उचलण्यात येतील.

Devendra Fadnavis
Brij Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहचा पाय खोलात! कोर्टानं ७ विविध कलमांतर्गत केली आरोप निश्चिती

निर्भया केसनंतर कसा बदलला कायदा?

निर्भया केसनंतर देशभरात बलात्कार प्रकरणाची परिभाषाच बदलून गेली होती. यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे संसदेत नवा जुवेनाईल जस्टिस बिल मंजूर झालं होतं. ज्यामध्ये बलात्कार, हत्या आणि अॅसिड हल्ल्यासारख्या क्रूर गुन्ह्यांमध्ये १६ ते १८ वर्षांमधील अल्पवयीन आरोपींवर देखील प्रौढ कायद्यांतर्गत सर्वसामान्य कोर्टांमध्ये केस चालवता येऊ शकते.

Devendra Fadnavis
Pune Porsche Accident: आमदार टिंगरेंनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर अजितदादांचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन; काय झाली चर्चा?

जास्तीत जास्त शिक्षा किती?

या नव्या कायद्यांतर्गत १६ ते १८ वर्षांच्या आरोपींना बाल संरक्षण गृहात ठेवण्याऐवजी शिक्षा होऊ शकते. पण ही शिक्षा जास्तीत जास्त १० वर्षांसाठी असू शकते किंवा या कायद्यांतर्गत शिक्षा झाल्यास फाशी किंवा जन्मठेप होऊ शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.