PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त वाहतुकीत बदल

हा बदल मंगळवारी सकाळी सहा ते दुपारी तीनवाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात राहणार आहे
PM Modi Pune Visit
PM Modi Pune VisitSakal
Updated on

पुणे : शहरातील विकासकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अति महत्त्वाच्या व्यक्ती एक ऑगस्ट रोजी शहरात येत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात हे कार्यक्रम होणार असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. हा बदल मंगळवारी सकाळी सहा ते दुपारी तीनवाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात राहणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, टिळक (अलका टॉकीज) चौक, टिळक रस्ता, देशभक्त केशवराव जेधे चौक,

गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन कॉलेज) रस्ता, संगमवाडी रस्ता, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रस्ता याठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात येतील. वाहनचालकांनी गैरसोय टाळण्यासाठी या मार्गांचा वापर टाळून इतर पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

सारसबागेकडे जाणारा मार्ग खुला

टिळक रस्त्याने एस.पी. कॉलेज चौकात आल्यानंतर ना.सी. फडके चौकाकडे जाण्यासाठी (एस.पी. कॉलेज चौकातून) उजवीकडे जाणारा मार्ग खुला करण्यात आला आहे.

सोमवारीही रंगीत तालीम, वाहतुकीत बदल

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलिसांनी रविवारी (ता. ३०) रंगीत तालीम घेतली. शहरातील मध्यवर्ती भागात काही वेळांसाठी बॅरिकेड॒स लावून वाहतूक बंद केली होती.

परिणामी वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागले. सोमवारी पुन्हा रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. त्यामुळे बॅरिकेड॒स लावून शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक दोन ते तीन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

ड्रोनच्या वापरास बंदी

पुणे शहर परिसरात ड्रोनच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे. येत्या दोन ऑगस्टपर्यंत ही बंदी राहील. याबाबत उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com