वाहतुकीची परिस्थिती पाहून वाहतूक वळविण्यात येणार आहे. या कालावधीत खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.
पुणे : अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त (Angaraki Sankashti Chaturthi) मंगळवारी (ता. २५) शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर (Dagdusheth Halwai Ganpati) येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. शिवाजी रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहेत.
पीएमपी बसेस, चारचाकी आणि जड वाहनांना शिवाजी रस्त्यावर मंगळवारी गर्दी संपेपर्यंत बंदी राहील. आवश्यकतेनुसार चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर लाल महाल चौकापासून निर्बंध राहतील. वाहतुकीची परिस्थिती पाहून वाहतूक वळविण्यात येणार आहे. या कालावधीत खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.
-पूरम चौकातून बाजीराव रस्त्यावरून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी पूरम चौकातून टिळक रस्त्याने टिळक (अलका टॉकीज) चौक आणि पुढे नामदार गोपाळकृष्ण गोखले (एफसी) रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
-शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहन चालकांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक- टिळक चौकातून टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
-स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.
-अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी बाजीराव रस्त्याने सरळ पुढे इच्छितस्थळी जावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.