पुणे : शहराच्या दक्षिण भागातील पाणी पुरवठ्यात सोमवार (ता. १९) पासून महापालिकेने बदल केला आहे. केदारेश्वर आणि महादेवनगर टाक्यांतून होणारा पाणी पुरवठा आठवड्यातून एक दिवस विभागानुसार बंद ठेवला जाणार आहे.
वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून शहराच्या दक्षिण भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी राजीव गांधी पंपिंग स्टेशन येथून दोन पाण्याच्या टाक्यांना पाणी पुरवठा केला जातो. तर या दोन्ही टाक्यांतून पाणी पुरवठा केला जाणाऱ्या भागांचे सात उपविभाग केले आहेत. या उपविभागाचा आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवणार आहे.
केदारेश्वर टाकी (दिवस आणि परिसर) -
सोमवार : साईनगर, गजानन महाराजनगर, शांतिनगर, महानंद सोसायटी, सावंत सोसायटी
मंगळवार : टिळेकरनगर, कामठे पाटीलनगर, खडीमशिन चौक, सिंहगड कॉलेज, आकृती सोसायटी, कोलते पाटील सोसायटी
बुधवार : सुखसागरनगर भाग दोन
गुरुवार : शिवशंभोनगर, विद्यानगर, आनंदनगर, अशरफनगर, सावकाशनगर, काकडेवस्ती, गोकुळनगर
शुक्रवार : कोंढवा बुद्रूक, वटेश्वर मंदिर, मरळनगर, हिलव्ह्यू सोसायटी, ठोसनगर, लक्ष्मीनगर
शनिवार : राजीव गांधीनगर, चैत्रबन, कृष्णानगर, झांबरे वस्ती, अण्णा भाऊ साठे नगर, ग्रीन पार्क, अजमेरा सोसायटी
रविवार : शिवप्लाझा सोसायटी, पिसोळी रस्ता, पारगेनगर, हगवणे वस्ती, आंबेडकरनगर
महादेवनगर टाकी :
सोमवार : कात्रज गाव, सातारा रस्ता
मंगळवार : राजस सोसायटी, कमला सिटी, इंद्रप्रस्थ सोसायटी, भूषण सोसायटी, निरंजन सोसायटी, बलकवडेनगर, स्टेट बॅंक कॉलनी
बुधवार : सुखसागरनगर भाग १
गुरुवार : शिवशंभोनगर (डोंगराचा भाग), महादेवनगर, स्वामी समर्थनगर, विघ्नहर्तानगर, महावीरनगर
शुक्रवार : वाघजाईनगर, प्रेरणा हॉस्पिटल, गुलाबशहानगर
शनिवार : उत्कर्ष सोसायटी, शेलारमळा, माऊलीनगर, वरखडेनगर, जाधवनगर, पोलिस कॉलनी, साईनगर
रविवार : भारतनगर, दत्तनगर, जोगेश्वरीनगर, मोरेवस्ती, निंबाळकर वस्ती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.