आज पुण्यातही याच मागणीच्या अनुषंगानं हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
पुणे : धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याच्या मागणीनं गेल्या काही महिन्यांपासून जोर धरला आहे. राज्यातील विविध ठिकाणी या मागणीसाठी मोर्चे काढण्यात येत आहेत.
आज पुण्यातही याच मागणीच्या अनुषंगानं हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद यासाठी कडक कायदे करावेत, त्याची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं (Hindu Community) आज 'हिंदू जन आक्रोश मोर्चा'चं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चात भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale) सहभागी झाले आहेत.
यावेळी मोर्चाला संबोधित करताना शिवेंद्रराजे म्हणाले, 'हिंदू समाजात जे भीतीचं वातावरण झालंय, त्या भीतीला वाचा फोडण्यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आला आहे. प्रत्येक तालुका-शहरात हा मोर्चा काढला जात आहे.'
केंद्रात मोदींचं सरकार आहे. राज्यात आमचं सरकार आहे, त्यामुळं या मोर्चाच्या मागण्यांची दखल नक्कीच घेण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, त्यामध्ये धर्माचं रक्षण करणं हा देखील भाग होता. आम्ही कोणाच्या विरोधात नाही. परंतु, आमच्या धर्माचं रक्षण आम्ही करत आहोत, असं त्यांनी सांगितलं.
आतापर्यंत आपण जो इतिहास वाचला. त्यात छत्रपती संभाजी महाराजांची ओळख 'धर्मवीर' म्हणूनच इतिहासात केली गेली आहे, त्यामुळं यावरती चर्चा होऊ नये, असं सांगत त्यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षकच होते, असं रोखठोक वक्तव्य केलं होतं, याला शिवेंद्रराजेंनी उत्तर दिलंय.
हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरायला लागलं तरी चालेल, पण देश आणि धर्माला तडजोड नाही. आता आपल्याला एकत्र आल्याशिवाय पर्याय उरला नाही. शिवाजी महाराजांना आपण आराध्य दैवत मानतो. सध्या धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल राजकारण सुरु आहे, हे नक्कीच दुर्दैवी आहे. आपण हे सहन करत राहिलो तर आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. लोकं म्हणतात औरंगजेब सीमेचं रक्षण करायला आला होता. पण, हे वक्तव्य हास्यास्पद आहे. तो तिथं हिल स्टेशनला आला होता का? असा सवालही शिवेंद्रराजेंनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.