पुणे : पूर्व वैमनस्य असलेल्या गोट्या नावाच्या व्यक्तीला भेटल्याने अभिषेक ऊर्फ छोट्या अलटे या आरोपीने एकावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गणेश तेजबहाद्दूर ठाकूर (वय 25, रा.बिबवेवाडी) याची तीन बोटे तुटली आहेत.
रविवारी (ता.6) रात्री अकरा वाजता वानवडी येथील नेपियर रस्त्यावर ही घटना घडली. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गणेश हा त्याच्या तोंड ओळखीच्या गोट्या नावाच्या व्यक्तीला रस्त्यात गळा भेट घेऊन भेटला होता. त्याचा अभिषेक ऊर्फ छोट्या अलटे आणि अनिकेत ऊर्फ अँण्डी अलटे या दोघांना राग आला होता. त्यांनी गणेश याला याचा जाब विचारत धमकावले. त्यावरून वाद झाल्याने अँण्डीने गणेशला शिवीगाळ करत कॉलर पकडली. तर छोट्याने मागून येत धारदार शस्त्राने डोक्यात आणि हाताच्या बोटावर वार केले. यात गणेश यांची करंगळी आणि शेजारील दोन बोटे तुटून पडली आहेत. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक भगवान कांबळे करत आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited By : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.