Eknath Shinde: पुण्यातील चांदणी चौक लोकार्पण समारंभाला मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी? राजकीय चर्चांना उधाण

चांदणी चौक पुलाचे आज उद्घाटन होणार आहे, परंतु या समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार नसल्याचे वृत्त आहे
Eknath Shinde
Eknath ShindeEsakal
Updated on

चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार नसल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्याच्या दरे या गावी मुक्कामी आहेत. उड्डाणपूलाच्या उदघाटन सोहळ्याला मुख्यमंत्री प्रमुख अतिथी होते. मुख्यमंत्र्यांनी त्याच्या या कार्यक्रमात अचानक बदल करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे कार्यक्रमाला येणार नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

साताऱ्यातील आपल्या गावी थांबणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आज चांदणी चौक उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख अतिथि म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी आहेत. त्यामुळे ते या कार्यक्रमाला येणार नसल्याची माहिती आहे.

Eknath Shinde
Pune Metro: पुणेकरांनो आजपासून ४ दिवस बाणेर रस्ता वाहतुकीसाठी बंद; वापरा हे पर्यायी मार्ग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच दहा महिन्यांपूर्वी चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. ते साताऱ्याकडे जात असताना वाहतूक कोंडीत अडकले होते. यावेळी पुणेकरांनी ही समस्या त्यांच्याकडे मांडली होती. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर पुलाचे काम करण्याचे आदेश दिले होते. परंतु आता तेच समारंभाला येणार नसल्याचे वृत्त आहे.

Eknath Shinde
Maharashtra Rain Update : विदर्भात पावसाची ७ दिवसांपासून विश्रांती; जाणून घ्या राज्यातील पावसाची स्थिती

यासंबधीचे वृत्त 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी पुलाचे उद्घाटन करणार आहेत.

आज सकाळी ११ वाजता हा समारंभ होणार आहे. उद्घाटनाची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार ,पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर राहणार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.