- प्रज्वल रामटेके
पुणे - सततचा पाऊस, ढगाळ हवामान, दुपारी उकाडा आणि रात्री गारवा अशा संमिश्र वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यातच पावसाच्या पाण्याने रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. याच पाण्यात ‘एडीस इजिप्ती’ डासांची पैदास होत असल्याने शहरातील अनेक भागांमध्ये ताप, डेंगी, झिका आणि चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून येत आहेत.