दौंड - दौंड शहरात मुलांना उंटावर बसवून चक्कर करून देणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांविरूध्द बालक व बालिकांशी लैंगिक चाळे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघा विकृतांविरूध्द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स (पोक्सो) कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.