Child Marriage: अक्षय्य तृतीयेला पुणे जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ देऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

पुणे जिल्ह्यात बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देशमुख यांनी या आदेशाद्वारे दिला आहे. राज्यात सन २००६ पासून बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आलेला आहे.
Child marriage  News
Child marriage Newsesakal
Updated on

पुणे - अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात विवाह केले जातात. या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविकांनी आपापल्या गावात दक्षता घ्यावी आणि या दिवशी जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व सरपंच आणि ग्रामसेवकांना दिला आहे.

पुणे जिल्ह्यात बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देशमुख यांनी या आदेशाद्वारे दिला आहे. राज्यात सन २००६ पासून बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आलेला आहे.

या कायद्यांतर्गत बालविवाह आयोजित करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. शिवाय जिल्ह्यात अल्पवयीन बालकांच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या बनू लागल्या आहेत. कोरोना काळातील सततचे लॉकडाउन), ऑनलाइन शाळा, बेरोजगारी यामुळे जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे.

Child marriage  News
Mumbai News : रस्त्यासाठी घारीवलीकर उतरले रस्त्यावर ; गावकऱ्यांसाठी छेद रस्ता खुला करण्याची मागणी

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सामुदायिक व एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाह असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण बालविवाह ही प्रथा बाल हक्काच्या विरोधी असून बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ अनुसार असे विवाह बेकायदेशीर असतात. या विरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित असून अशा गुन्ह्यात १ लाख रुपये दंड व २ वर्ष सक्तमजुरीच्या शिक्षेची तरतूद आहे.

बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्ह्यात ग्राम बाल संरक्षण समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त केलेले आहे. तसेच गावपातळीवर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्राम बाल संरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. अंगणवाडीसेविका या ह्या समितीच्या सदस्य-सचिव आहेत.

त्वरित पोलिसांशी संपर्क साधा - कांबळे

जिल्ह्यात कुठेही बालविवाहाबाबतची घटना घडत असल्याचे दिसताच, त्वरित जवळचे पोलिस ठाण्यातील बाल कल्याण पोलिस अधिकारी, सहायक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बाल कल्याण समिती, ग्राम बाल संरक्षण समिती, तालुका बाल संरक्षण समिती,

चाइल्ड लाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ए.एस. कांबळे यांनी केले आहे. याशिवाय चाइल्ड लाईन हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक १०९८ किंवा पोलिस हेल्पलाइन क्रमांक ११२ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.