Pune News: घरोघरी राजमाता जिजाऊंचे संस्कार मुलांवर झाले पाहिजे-पद्मश्री गिरीश प्रभुणे

मुक्ताबाई काळे यांना आदर्श राजमाता जिजाऊ पुरस्कार देवून सन्मान...
Pune News
Pune News
Updated on

पुणे- राजमाता जिजाऊंच्या जयंतीचे औचित्य साधून पालकत्व फाउंडेशन व राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार समितीने विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तुत्वान माणसं घडवणाऱ्या त्यांच्या आईसाहेबांना राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार 2023 देऊन सन्मान करण्यात आला.

यामध्ये संपादक,लेखक, संघटक संदीप काळे यांच्या आई मुक्ताबाई काळे यांना आदर्श राजमाता जिजाऊ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.

आपल्या अध्यक्षीय भाषणांमध्ये राजमाता जिजाऊने शिवबांना कसे घडवले व कसे संस्कार दिला त्याचे सुंदर विवेचन पद्मश्री गिरीशप्रभुणे यांनी केले.

पूर्ण भारतभर मराठी राज्य पसरवणाऱ्या व विविध भाषा अवगत असणारे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपतीसंभाजी महाराज यांना राजमाता जिजाऊने खूप चांगले संस्कार दिले.

त्याप्रमाणे आता प्रत्येक घरामध्ये तुकोबारायांच्या गाथा, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत यासारखे महान ग्रंथ आत्ताच्या मातांनी आपल्या मुलांना सांगितले पाहिजे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजे जाधवराव घराण्याचे वंशज विक्रमसिंह राजे अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सौ. सुनंदाताई राजेंद्रदादा पवार आणि श्री मोहन दादा जोशी हे होते.

सुनंदाताईंनी आपल्या मार्गदर्शनांमध्ये आताच्या पिढीतील मुलींच्या समस्या हाताळताना राजमाता जिजाऊंचे संस्कार कसे उपयोगीपडतात याबद्दल माहिती सांगितली. साडेतीनशे वर्षांपूर्वी एका मातेने स्वप्न बघून शहाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपतीशिवाजी महाराजांच्या माध्यमातून हजारो महिलांना न्याय दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हर एक संकट प्रसंगी आईसाहेबम्हणून राजमाता जिजाऊंनी फक्त राजांनाच मार्गदर्शन केले नाही तर प्रसंगी स्वराज्याची धुरा ही सांभाळली.

राजमाता जिजाऊंचेपालकत्वाचे विचार आताच्या समाजाला घडवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. श्री मोहनदादा जोशी यांनी पुरस्कार विजेत्यामाता बद्दल गौरवोद्गार काढताना अशा मातांमुळेच देश घडला अशी भावना व्यक्त केली.

यावर्षी मुख्य पुरस्कार तीन पिढ्यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वाई येथील श्रीमती सुमन तानाजीराव कदमयांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.

सर्व मातांच्या वतीने प्रातिनिधिक माता म्हणून सुमन ताईंची ग्रंथ तुलाहीकरण्यात आली. ग्रंथतुलेतील ग्रंथ नंतर सर्वांना वाटण्यात आले.

त्याचबरोबर सौ. मंदाकिनी सुधाकर वाघ शेती, सौ. मुक्ताबाई रामराव काळे पत्रकारिता, सौ. बायडाबाई खंडू लकडे खेळ, श्रीमती आशा शिवाजीराव पापळ उद्योग, श्रीमती इंदुमती वसंतराव चौधरी राजकारण, स्वर्गीय शारदाबाई प्रतापराव गायकवाड समाजकारण, श्रीमती नलिनी विजयकुमार शहा वैद्यकीय, सौ. कमलताईउत्तम टिळेकर कला, उमेद परिवार विशेष मुलांसाठी काम करणारी पालकांनी बनवलेली संस्था यांनाही मानपत्र व सन्मानचिन्ह देऊनगौरवण्यात आले.

पुरस्कार्थीच्यां वतीने अ‍ॅडव्होकेट श्री. सचिन वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. अतिशय कौटुंबिक व भावपूर्णवातावरणात संपूर्ण सोहळा पार पडला.

सर्व मातांना अभूतपूर्व समाधान लाभले आणि आनंदाश्रूच्या रूपाने भावना व्यक्त केल्या. याकार्यक्रमाचे प्रास्ताविक पालकत्व फाउंडेशनचे श्री विक्रम ननवरे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. विराज देशमुख यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.