घरातच बसावे लागल्याने मुले वैतागली; खेळही झाले बंद

कोरोनामुळे शाळेला सुटी दिली तेव्हा खूप आनंद झाला. आता मात्र घरात बसून खूप कंटाळा आला आहे. वर्ष होऊन गेले मित्र आणि मैत्रिणी भेटले नाही.
Student
StudentSakal
Updated on

पुणे - कोरोनामुळे (Corona) शाळेला सुटी (School Holiday) दिली तेव्हा खूप आनंद झाला. आता मात्र घरात बसून खूप कंटाळा (Boring) आला आहे. वर्ष होऊन गेले मित्र आणि मैत्रिणी (Friends) भेटले नाही. ऑनलाइन तासाला बसतानाही आता मन लागत नाही. वर्गात शिकविताना सर सगळं समजून सांगायचे. आता ते मोबाईलवर होत नाही. कोरोनामुळं बाहेर खेळायलाही (Playing) जाता येत नाही, अशी प्रतिक्रिया पाचवीत शिकणाऱ्या श्रेया खाडे या विद्यार्थिनीने (Student) व्यक्त केली. (Children were Annoyed as they had to Stay at Home)

शाळेच्या स्वतंत्र भावविश्‍वात वाढणाऱ्या मुलांना गेल्या वर्षभरापासून बाहेर फिरता येत नाही. घरात बसून त्यांना कंटाळा आला असून, मैदानी खेळही खेळता येत नसल्याने ऐन उमेदीत लहान मुलांमध्ये विविध मानसिक समस्या जाणवत आहे.

तिसरीच्या वर्गात शिकणारा श्रीतेज गुजर म्हणतो, ‘‘लॉकडाउनच्या काळात खेळ खेळता येत नाही. त्यामुळे जसा आधी आनंद घ्यायचो तसा आता मिळत नाही. लॉकडाउननंतर मी खूप मौज-मजा करणार आहे.’’ पालकांना मुलांचे मनोधैर्य वाढविण्यास तारेवरची कसरत करावी लागते.

Student
पुण्यातील भावाला थेट एलॉन मस्कचा रिप्लाय; ट्विटरवर दिलं प्रश्नाचं उत्तर

पालकांनी काय करावे?

  • मुलांचे मानसिक व शारिरिक आरोग्याकडे लक्ष द्यावे

  • मुलांना नवनवीन गोष्टी शिकून त्यात व्यस्त ठेवा

  • सकारात्मक विचार करायला लावा

  • मुलांवर ओरडू नये

  • मुलांना योगा शिकवा

कोरोनोमुळे पुण्यात लॉकडाउन लावला. आता मी गावाकडे आजी-आजोबांकडे आलो आहे. गावाकडे खूप काही शिकायला मिळत आहे. गावातल्या नव्या मित्रांसोबत पोहायलाही शिकलो.

- वेदांत साळवे (इयत्ता सातवी)

सध्या वर्क फ्रॉम होम असल्याने घरूनच ऑफिसची कामे करावी लागतात. सोबत घरचं काम त्यामुळे मुलांना सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते.

- शिल्पा खाडे (पालक)

डिजिटल माध्यमातून मुलांच्या शंकाच निरसन होईलच असे नाही. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद आता तुटला आहे. पर्यायाने मुलांचा औपचारिक शिक्षणाचा वेग मंदावला आहे.

- नम्रता गाढवे, शिक्षक

लॉकडाउनमुळे मुलांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. शारीरिक आणि मानसिक वाढीच्या काळातच त्यांना यासाठी प्रतिकूल वातावरणाचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी पालकांनी त्यांच्या आहाराबरोबरच शारिरिक वाढीकडेही लक्ष द्यावे.

- डॉ. तुषार पारेख, बालरोगतज्ज्ञ, केईएम हॉस्पिटल

Student
कोरोनामुळे भारतीय विद्यार्थी अडचणीत; रखडले परदेशी शिक्षण

मानसिक परिणाम

1) अकारण भीती

2) एकेकटे वाटणे

3) आळशीपणा

4) झोप कमी लागणे

5) वजन वाढणे

6) एकाग्रतेचा अभाव

7) चिडचिडेपणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.