पुणे : चिमुकल्या जीवाने १०० दिवसांनी जिंकली लढाई

सहाव्या महिन्यात जन्मलेल्या अर्भकावर यशस्वी उपचार
 चिमुकल्या जीवाने १०० दिवसांनी जिंकली लढाई
चिमुकल्या जीवाने १०० दिवसांनी जिंकली लढाईsakal
Updated on

पुणे : जेमतेम अर्ध्या किलोचं नुकतेच जन्माला आलेलं ते बाळ. या जगात येताच त्याला क्षणार्धात प्लॅस्टिकच्या पिशवीत घेतले. त्या क्षणापासून त्याची मृत्यूशी झुंज सुरू झाली. सलग शंभर दिवस तो चिमुकला जीव झगडत होता. तो लढला आणि आयुष्याची लढाई जिंकलाही!

‘त्या’ दांपत्याचं हे पहिलंच मुल. आपल्या घरात आपलं मुलं येणार, या आनंदात हे दांपत्य होतं. पण, त्याच वेळी गरोदरपणात आईचा रक्तदाब वाढला होता. त्यामुळे नऊ महिने पूर्ण भरण्याआधीच सिझेरियन करून प्रसूती करण्याशिवाय डॉक्टरांकडे पर्याय राहील नव्हता. गर्भधारणेच्या सहाव्या महिन्यात ही प्रसूती करावी लागली. प्रसूतीच्या वेळी ज्युपिटर हॉस्पिटलच्या नवजात अर्भक तज्ज्ञांचे पथक उपस्थित होते.

 चिमुकल्या जीवाने १०० दिवसांनी जिंकली लढाई
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर मॅंगो ट्रेनसाठी चाचपणी

प्रसूती झाल्यानंतर लगेचच त्या बाळाला प्लॅस्टिकच्या पिशवीत घातले. कारण, अशा नवजात अर्भकांच्या शरीराचे तापमान वेगाने कमी होते. शरीराची त्वचा अत्यंत नाजूक असते. जेमतेम ४८० ग्रॅमच्या अर्भकाला अवघ्या पाच मिनिटांमध्ये व्हेंटिलेटर ठेवले. त्या बाळाला प्रसूतीगृहातून खास वाहनातून ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

नवजात अर्भकांच्या विभागामध्ये तब्बल शंभर दिवस ठेवल्यानंतर त्याची जगण्याची लढाई यशस्वी झाली. हॉस्पिटलमधून घरी पाठवताना त्याचे वजन दोन किलोग्रॅम होते. ते बाळ सध्या त्याच्या घरी असून त्याच्या वजनात वाढ होत आहे. तसेच बाळाच्या वाढीच्या सामान्य खुणा आता दिसत आहेत, असे हॉस्पिटलमधील नवजात अर्भक तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास तांबे यांनी सांगितले.

उपचारातील आव्हाने

  • सहाव्या महिन्यातील ४८० ग्रॅम वजनाच्या नवजात अर्भकाचे सगळेच अवयव अत्यंत नाजूक असतात. पोटातील आतडी, मेंदू, फुफ्फुसे असे महत्त्वाचे अवयव पूर्णपणे विकसित झालेले नसतात.

  • हे बाळ इतके छोटे होते की त्याला पोषक आहार आणि प्रतिजैविके देणे जिकिरीचे होते.

  • इवल्याशा शरीरातील नसा सापडणं हे अवघड असतं.

असे केले उपचार

  • नवजात अर्भकांच्या अतिदक्षता विभागात त्याला दाखल करणे अपरिहार्य होते. शरीराच्या तापमानाचे संतुलन राखण्यासाठी अर्भकाला ‘एनक्युबेटर’मध्ये ठेवावे लागले.

  • अत्यंत नाजूक बाळाला प्रतिजैविके, पोषक आहार हा नाळेवाटे दिला जातो. त्यासाठी कॅथेटरचा वापर करण्यात आला.

  • नाळेतूनच त्याच्या रक्तदाबावर देखरेख केली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()