गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी; थेऊरच्या 'श्री चिंतामणी' मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी बंद

Theur_Ganesh_Temple
Theur_Ganesh_Temple
Updated on

लोणी काळभोर (पुणे) : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील 'श्री चिंतामणी मंदिर' बंद ठेवण्याचा निर्णय हवेलीचे अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून मंगळवारी (२ मार्च) अंगारकी चतुर्थीनिमित्त तसेच पुढील येणाऱ्या संकष्टी चतुर्थीलाही 'मंदिर बंद' ठेवण्यात येणार आहे.

संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थी यानिमित्ताने 'श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. भाविकांच्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. कोरोनाचा वाढता धोका पाहून अनेक धार्मिक स्थळे तसेच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर थेऊरचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय हवेलीचे अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी घेतला आहे.

दरम्यान, पूर्व हवेलीतील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे महाराष्ट्र शासनाच्यावतीने नागरिकांना  आवाहन करण्यात येत आहे.

मागील वर्षी कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असून नवीन वर्षात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे अंगारकी चतुर्थीला 'मंदिर बंद' करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला आहे. कोरानाचा संसर्ग होऊ नये. यामुळे 'श्री चिंतामणी गणपती' दर्शन पुढील सूचना मिळेपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तरी, भाविकांनी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत करून प्रशासनास सहकार्य करावे. 
- आनंद तांबे, विश्वस्त, चिंचवड देवस्थान ट्रस्ट

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.