पुणे : प्रभात रस्ता परिसरात सातत्याने होणाऱ्या घरफोड्यांच्या (burglary and theft)घटनांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अशा घटना रोखण्यासाठी व नागरीकांमध्ये सुरक्षितता निर्माण व्हावी, यासाठी आता पोलिसांना नागरीकांची खंबीर साथ मिळणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरीकांनी डेक्कन पोलिसांशी चर्चा (Deccan Police Station)करुन याबाबत आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
प्रभात रस्ता परिसरात बंगले, मोठमोठ्या सोसायट्या आहेत. याच परिसरात मागील काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहे. त्यामुळे नागरीकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयी नागरीकांनी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे (EKBOTE JYOTSNA)यांच्याकडे आपली समस्या मांडली. त्यानंतर एकबोटे, प्रभात रस्ता परिसरात राहणारे ज्येष्ठ नागरीक, विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांची भेट घेतली. त्यावेळी या प्रश्नाबाबत करपे, एकबोटे व नागरीकांची बैठक झाली.
या बैठकीमध्ये घरफोड्याच्या घटना करणाऱ्या गुन्हेगारांना तत्काळ पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, रात्रीच्यावेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशा रहीवाशांच्या मागण्या एकबोटे यांनी पोलिसांसमोर मांडल्या. या मागण्या तत्काळ मान्य करुन करपे यांनी रात्र गस्त वाढविण्याबरोबरच नागरीकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची सुरक्षा अधिक मजबुत करू, असे आश्वासन दिले. तसेच ज्येष्ठ नागरीकांची नोनदणी करुन त्यांनाही आवश्यक ती मदत वेळेत पोचवू असे सांगितले. त्यावेळी घरफोडीच्या घटना टाळण्यासाठी तसेच सुरक्षिततेसाठी नागरीकांकडून आवश्यक सर्वतापरी मदत पोलिसांना करू एकबोटे यांनी नागरीकांच्यावतीने करपे यांना सांगितले.(Pune news)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.