विविध अंगांने पुणे शहराचा विकास व्हावा; चंद्रकांत पाटील

'स्थानिक जनतेला प्राथमिक नागरी सुविधा पुरवणे हे लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांचे कर्तव्यच आहे.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSakal
Updated on
Summary

'स्थानिक जनतेला प्राथमिक नागरी सुविधा पुरवणे हे लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांचे कर्तव्यच आहे.

औंध - 'स्थानिक जनतेला प्राथमिक नागरी सुविधा पुरवणे हे लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांचे (Corporator) कर्तव्यच आहे. परंतु यासह सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन पुरक सुविधाही (Convenience) पुरवल्या गेल्या पाहिजेत व शहराचा विविध अंगाने विकास व्हावा" असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केले. नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या विकास निधीतून नव्वद लाख रुपये खर्चातून बाणेर सर्वे क्रमांक ५४ रोहन लेहर सोसायटी जवळ मोहन नगर येथील कै. बाळकृष्ण गुलाबराव तापकीर या उद्यानाचे उदघाटन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर, गुलाबराव तापकीर, ज्ञानेश्वर तापकीर, शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, राहुल कोकाटे, स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर, प्रभाग अध्यक्षा उमा गाडगीळ, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले 'बाणेर भागातील भाजपचे नगरसेवक हे स्थानिक संदर्भ शोधून प्रत्येक ठिकाणी योग्य व्यक्तींची नावे देऊन त्या त्या व्यक्तींचा योग्य सन्मान करत आहेत हि आनंदाची बाब आहे.

Chandrakant Patil
घराबाहेरील नातेवाईकांविरोधातही घरगुती हिंसाचारांतर्गत तक्रार

तसेच, प्राथमिक सुविधा पुरवतानाच येथील नागरिकांच्या आणखी गरजा ओळखून इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न करावेत. 'नव्वद लाख रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या या उद्यानात लहान मुलांसह सर्व वयोगटातील नागरीकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यावेळी पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेले नागरिक व वसुंधरा अभियान संस्थेसह इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी संजय पाडाळे, काळूराम गायकवाड, शरद भोते, संतोष तापकीर, अर्जुन शिंदे अशोक पिळणकर, रविंद्र महाजन, सौदागर शिंदे, प्रदीप रामाणे, एस. एम. कुलकर्णींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.