स्वच्छ सर्वेक्षण २०२३, माझी वसुंधरा ३.० अंतर्गत प्लॅस्टिक मुक्त इंदापूरसाठी जनजागृती वारी

कारवाईत २५ हजार रुपयांचे ६० किलो प्लॅस्टिक जप्त
Clean Survey 2023 Awareness for Plastic Free Indapur My Vasundhara 3 0 scheme
Clean Survey 2023 Awareness for Plastic Free Indapur My Vasundhara 3 0 scheme sakal
Updated on

इंदापूर : स्वच्छ सर्वेक्षण २०२३, माझी वसुंधरा ३.० व जगतगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरात प्लॅस्टिक मुक्त इंदापूर, प्रदूषण मुक्त वारी,तंबाखू, गुटखा बंदी अभियान तसेच पर्यावरण संतुलनसाठी हरित वारीचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी आठवड्यात जप्त करण्यात आलेल्या ६० किलो प्लॅस्टिकवर २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.नगरपरिषद मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या नेतृत्वाखाली शहर बाजारपेठेतून ही अभिनव वारी पार पडली. यावेळी वारीत फळ विक्रेते तसेच व्यापाऱ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी रामराजे कापरे म्हणाले, शहरातील व्यापाऱ्यांनी १ जुलै पासून ७५मायक्रान प्लॅस्टिक न वापरल्यास त्यांना दंडात्मककारवाईस सामोरे जावे लागेल.शहरात येणारा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ही अध्यात्मिक पर्वणी आहे.त्यामुळे प्रदूषणमुक्त वारी होण्यासाठी सर्वांनी प्राधान्य देणे गरजेचे आहे. पर्यावरण संतुलन व हरित वारीसाठी सर्वांनी सकारात्मक योगदान देणे गरजेचे आहे.तंबाखू व गुटखा खाऊनसार्वजनिक जागेवर थुंकणाऱ्या,उघड्यावर लघवी व शौचास बसणाऱ्या तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. इंदापूरकरांनी शहर व आपला परिसर स्वच्छ, सुंदर, हरित ठेवून शहराचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन त्यांनी केले. .या अभिनव दिंडीत नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. सर्वांनी शेवटी वसुंधरा संवर्धन करण्याची सामूहिक शपथ घेवून हरित दिंडीचा समारोप नगरपरिषद प्रांगणात करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()