पुणे - मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाला सुधारित पर्यावरण परवानगी मिळाल्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने याविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे महापालिकेला या प्रकल्पांचे काम वेगात करता येणार आहे.
महापालिकेने संगमवाडी ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा पूल या दरम्यान नदीकाठ सुधार प्रकल्पाचे काम मार्च २०२२ मध्ये सुरु केले आहे. संगमवाडी ते बंडगार्डनपर्यंतच्या टप्प्याने काम ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर बंडगार्डन ते मुंढवा पूल या दरम्यानचे काम २७ टक्के झाले आहे.