Pune News : राजगड तालुक्यातील पाबे गावात ढगफुटी; अंगणवाडी जमीनदोस्त; शाळेचेही मोठे नुकसान

उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांचे पंचनामा करण्याचे आदेश
Pune News : राजगड तालुक्यातील पाबे गावात ढगफुटी; अंगणवाडी जमीनदोस्त; शाळेचेही मोठे नुकसान
Pune News esakal
Updated on

वेल्हे : पाबे (ता.राजगड) येथे वादळी वाऱ्यासह बुधवारी (ता.२२)सायंकाळी अचानक झालेल्या ढगफुटीने गावातील अंगणवाडीचे छत उडाले असून इमारतीचे कॉलम देखील जमीनदोस्त झाले आहेत. तसेच शाळेचे स्वच्छतागृह, टाकी व छतावरील पत्र्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Pune News : राजगड तालुक्यातील पाबे गावात ढगफुटी; अंगणवाडी जमीनदोस्त; शाळेचेही मोठे नुकसान
Dhule Crime News : धुळ्यात 137 जणांवर गुन्हा; संशयितांचे धरपकडसत्र सुरू

वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की वर्गखोलीवरील पूर्ण छत अँगलसह जवळच असलेल्या पन्नास फूट उंच वडाच्या झाडावर जाऊन लटकले असल्याचे दिसून आले. तसेच गावातील घरावरील पत्रे उडून गेले असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर ढगफुटीमुळे गावातील ओढे आणि नाल्यांना पूर आला असून लिंबारवाडी व गावठाण यांना जोडणारा मुख्य रस्त्यावरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने गावाशी संपर्क तुटला आहे.

Pune News : राजगड तालुक्यातील पाबे गावात ढगफुटी; अंगणवाडी जमीनदोस्त; शाळेचेही मोठे नुकसान
Jalgaon News : वन्य प्राण्यांचा हल्ल्यात 25 लाखांपर्यंत मदत; पाणी, अन्नाच्या कमतरतेने प्राण्यांची गावाकडे धाव

तसेच शाळेच्या दोन वर्गखोल्या अत्यंत जीर्ण झालेल्या असून त्यांची डागडुजी अथवा दुरुस्ती न करता नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करून मिळावे अशी मागणी नागरिक करत आहेत, अन्यथा जीर्ण झालेल्या भिंतींमुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.

Pune News : राजगड तालुक्यातील पाबे गावात ढगफुटी; अंगणवाडी जमीनदोस्त; शाळेचेही मोठे नुकसान
Nashik Crime News : पेठ रोडवर समाजकंटकांकडून वाहनांची तोडफोड

वादळी वारा आणि ढगफुटी यामुळे गावातील अंगणवाडी, शाळा, घरे आणि विजेचे खांब यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने त्याची तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी.

-ज्योती रेणुसे, सरपंच पाबे.

महसूल प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने पंचनामा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना तालुका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. अहवाल प्राप्त होताच नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून संबंधितांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

-राजेंद्र कचरे, उपविभागीय अधिकारी, भोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.