मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरातील ढगाळ वातावरण कायम होते.
पुणे - मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरातील ढगाळ वातावरण कायम होते. एकंदरीत राज्यातच आता अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण झाल्याने शहरातही शुक्रवार (ता.२४) पर्यंत आकाश ढगाळ आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
शहरातील कमाल तापमानात चढ उतार होत असून, उकाडाही कायम आहे. बुधवारी कमाल तापमान ३१.१ अंश सेल्सिअस होते. तर किमान तापमान १४.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सकाळी निरभ्र असलेले आकाश चढत्या सूर्याबरोबरच ढगाळ होत गेले. दुपारनंतर बहुतेक ठिकाणी आकाश मुख्यतः ढगाळ होते. हा आठवडा तरी पुणेकरांची ढगाळ हवामानापासून सूटका दिसत नाही.
अजूनही तमिळनाडूपासून, कर्नाटक, तेलंगणा, विदर्भ ते छत्तीसगडपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच वाऱ्यांचे प्रवाहदेखील खंडित झाल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे.
गुरुवारी (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज असून, उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून राज्याच्या विविध भागात विजांसह वादळी पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.