Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचा लँडिंग स्पॉट अचानक का बदलला? वाचा भीमाशंकरमध्ये काय घडलं

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचा लँडिंग स्पॉट अचानक बदलण्यात आला आहे. दरम्यान आंबेगाव ऐवजी आता लांडेवाडी येथे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर झाले लँड करण्यात आले आहे
CM Eknath Shinde Helicopter
CM Eknath Shinde Helicopter esakal
Updated on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खराब हवामानाचा फटका बसला असून, यामुळे त्यांच्या भीमाशंकर दौऱ्यात व्यत्यय आला आहे. यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचा लँडिंग स्पॉट बदलण्यात आला आहे. दरम्यान आंबेगाव ऐवजी आता लांडेवाडी येथे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर झाले लँड करण्यात आले आहे. भीमाशंकर परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे.

आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असून, त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबियांसह श्री क्षेत्र भीमाशंकरला दर्शनासाठी आले आहेत.

मात्र, आज ते भीमाशंकरला येत असताना त्यांना खराब हवामानाचा फटका बसला. त्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर आंबेगावऐवजी लांडेवाडीत उतरवण्यात आले.

युवा सेनेचे पदाधिकारी सचिन बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून भीमाशंकरला श्रावण महिन्यात दर्शनासाठी येतात.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे हे सुद्धा दरवर्षी श्रावण महिन्यात भीमाशंकरला यायचे त्यावेळी त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदेही असायचे. आता दिघे यांचीच परंपरा शिंदेंनी कायम ठेवल्याचे दिसत आहे.

CM Eknath Shinde Helicopter
Railway Affected By Rain: महाराष्ट्रासह 20 राज्यांना पाऊस झोडपणार; 99 रेल्वे रद्द, मुंबईतून 'ही' एक्सप्रेस धावणार नाही, ट्रॅकही गेला वाहून

आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकरला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. अशात आज भीमाशंकरला मोठ्या प्रमाणात पाऊस आणि धुके असल्याने भाविकांचीही यामुळे गैरसोय होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

CM Eknath Shinde Helicopter
Uddhav Thackeray Mumbai HC: "मातोश्रीवर जाऊन ठाकरेंना दोन लाखांचा डीडी द्या," हायकोर्टानं कुणाला दिले आदेश? नेमकं काय आहे प्रकरण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.