सध्या राज्यात हनुमान चालिसा, भोंगे यावरून राजकीय वातावरण तापलेले आहे. या दरम्यान 1 मे रोजी पुण्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. महत्वाचे म्हणजे याच दिवशी औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील सभा होणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी दोन वेगळ्या पक्षनेत्यांच्या सभा राज्यात होणार असल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडमोडींवर मला देखील बोलायचं आहे, त्यासाठी सभा घेण्याचा विचार असल्याचे सांगितले होते, त्याला एक तारखेचा मुहूर्त मिळाला आहे. १ मेला राज ठाकरेंच्या सभेच्या दिवशीच पुण्यात मुख्यमंत्री सभा घेणार आहेत. दरम्यान या जाहीर सभेत ठाकरे हनुमान चालिसा, भोंगे, नवनीत राणा प्रकरण, तसेच आज पंतप्रधानांनी इंधन दरवाढ यावर केलेल्या आरोपांचा या सभेत समाचार घेताना दिसू शकतात.
दरम्यान, याआधी ३० एप्रिल रोजी पुण्यात महाविकास आघाडी नेत्यांची देखील जाहीर सभा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील अल्का चौकात ही मविआ नेत्यांची निर्धार सभा होणार असून यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे अनेक बडे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. या दोनही सभांकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
१ तारखेला संध्याकाळी औरंगाबादेत राज ठाकरेंची सभा होणार आहे, त्यांच्या मुद्दयांना खोडून काढण्यासाठी मविअचे सर्व प्रमुख नेते पुण्यात सभा घेणार आहेत. सामाजिक सलोखा राहावा यासाठी ही निर्धार सभा आयोजित करण्यात येत आहे, असे सांगण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.