पुणे - विधानसभा निकालापूर्वीच राज्यात ‘सीएनजी’च्या (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) दरात वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले म्हणून वाहनचालक ‘सीएनजी’कडे वळले आहेत. त्यात आता ‘सीएनजी’च्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे. त्यामुळे त्यांची अवस्था दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे.