Pune Cold : पुणेकरांना हुडहुडी! पाषाणमध्ये मोसमातील निच्चांक; पाषाण आणि हवेली येथे १०.६ अंश सेल्सिअस

पुणे शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील सर्वाधिक कमी तापमान पाषाण आणि हवेली येथे १०.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
winter cold
winter coldsakal
Updated on

पुणे - केवळ शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील सर्वाधिक कमी तापमान पाषाण आणि हवेली येथे १०.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद शनिवारी झाली असून, पुढील तीन दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गेल्या काही दिवसांत तापमानात घट झाल्याने पुणे जिल्ह्यातच गारठा वाढला आहे. शहरात पुन्हा थंडीची तीव्रता वाढली असून, पहाटे कडाक्याच्या थंडीसह धुके पडत आहे. संध्याकाळ नंतर गार वारे वाहत असून, तापमान कमालीचे घटत आहे. सलग दोन दिवस पुणे शहरातील सरासरी किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदविले गेले आहे.

आकाश मुख्यत- निरभ्र आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे शहरातील किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निदान आठवडाभर तरी पुणेकरांनी थंडीपासून बचावाची तयारी करावी.

अल्हाददायक वातावरणासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे शहर आणि जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रभाव होता. त्यामुळे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे किमान तापमानाचा पारा १५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला होता. पण, या बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रभाव ओसरला आहे. त्याच वेळी उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा थंडी पडत आहे.

शनिवारीचे किमान तापमान (अंश सेल्सिअस) -

- पाषाण, हवेली - १०.६

- माळीण - ११.३

- शिवाजीनगर - १२.०

- तळेगाव, बारामती - १२.५

- नारायणगाव, राजगुरुनगर, तळेगाव ढमढेरे - १३.४

- भोर - १३.९

- पुरंदर, बालेवाडी - १४.२

- दौंड, खेड - १५

- चिंचवड - १६.६

- लोणावळा, लवळे - १७.१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.