Junnar News : शिवभक्तांना सर्व सुविधा पुरविण्याची चोख व्यवस्था करा- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्सवासाठी येणाऱ्या शिवभक्तांना आवश्यक सेवा सुविधा पुरविण्याची चोख व्यवस्था करा.
collector dr suhas divase says provide nesseary things at shiv neri fort shiv bhakt at shiv jayanti
collector dr suhas divase says provide nesseary things at shiv neri fort shiv bhakt at shiv jayanti Sakal
Updated on

जुन्नर : किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्सवासाठी येणाऱ्या शिवभक्तांना आवश्यक सेवा सुविधा पुरविण्याची चोख व्यवस्था करा. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी येथे दिले.

जुन्नर तालुका पंचायत समितीच्या जिजाऊ सभागृहात आज बुधवार ता.१४ रोजी आयोजित आढावा बैठकीत डॉ.दिवसे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,उपवन संरक्षक अमोल सातपुते,पर्यटन विभागाच्या उपसंचालक शमा पवार,

गृहरक्षक दलाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे,माजी आमदार शरद सोनवणे,जिल्हा नियोजन समिती सदस्य आशा बुचके,तहसीलदार रवींद्र सबनीस,गटविकास अधिकारी हेमंत गरिबे मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष गणेश महाबरे,माजी अध्यक्ष राजेंद्र कुंजीर, ॲड.राजेंद्र बुट्टे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ.दिवसे म्हणाले, सर्वच यंत्रणांनी या उत्सवाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करावे.आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा, मेगाफोन देण्यात येतील.हा उत्सव हरित असावा म्हणून प्लास्टिक नियंत्रण करावे तसेच कचरा जमा करण्याची व विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करावी.

गर्दी नियंत्रणासाठी मुख्य सभेचे ठिकाण बदलण्याविषयक भारतीय पुरातत्व विभागासोबत (एएसआय) चर्चा सुरू आहे,शिवजन्मस्थळ तसेच शिवकुंजची सजावट, रोषणाई,पायथा ते दत्त मंदिर पर्यंत पथदिव्यांसाठी वीज व्यवस्था चांगल्या प्रकारे करावी.गडावर,पायथ्याशी तसेच शहरातही स्वच्छ्ता गृहे व स्वच्छता विषयक व्यवस्थापन करावे असेही दिवसे यांनी सांगितले.

ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.पंकज देशमुख म्हणाले,शिवभक्तांना कार्यक्रम सुरू असताना दर्शनासाठी अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागू नये प्रयत्न सुरू आहेत. फक्त मुख्य कार्यक्रमाच्या वेळी थोड्याच कालावधीसाठी गर्दीला थांबविण्यात येणार असून नागरिकांना हत्ती दरवाजा,

मीना दरवाजा,कुलूप दरवाजा या ठिकाणी तसेच अन्य ठिकाणीही कार्यक्रम पाहण्यासाठी एलईडी स्क्रीन बसविण्यात येतील. दत्त मंदिर येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.शिवजन्म उत्सवप्रसंगी गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने मर्यादित स्वरूपात प्रवेश पासेस देण्यात येणार आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी पाणीपुरवठा,स्वच्छ्ता, आरोग्य व्यवस्था आदींचा आढावा घेतला. शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरुपी वीज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सौर पॅनेल बसविता येतील का हे महाऊर्जाकडून तांत्रिक व व्यवहार्यता तपासणी करुन घ्यावी. परिवहन मंडळाने अधिकच्या बसेसची व्यवस्था करावी.

पर्यटन विभागाने गडावरील कार्यक्रमात सहभाग घेण्याच्या दृष्टीने पुढील काळात पुढाकार घ्यावा,ड्रोनद्वारे गर्दीची पाहणी व नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापनसाठी पथकांची नेमणूक आदी विषयांच्या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली.

माजी आमदार स्व. वल्लभ बेनके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संतोष खैरे, अँड. राजेंद्र बुट्टे पाटील, गणेश महाबरे, संतोष केदारी आदींनी विचार मांडले.तहसिलदार रविंद्र सबनीस सुत्रसंचलन केले.

गडावरील सुविधांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

आढावा बैठकीपूर्वी पहाटे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आणि पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपवन संरक्षक अमोल सातपुतेउपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे,

पर्यटन विभागाच्या उपसंचालिका शमा पवार,पुरातत्व विभागाचे संरक्षक सहाय्यक बाबासाहेब जंगले यांनी उत्सवाच्या दृष्टीने शिवनेरीवर सुविधांची पाहणी करून संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या.यावेळी राज्य सांस्कृतिक धोरण समिती(गड किल्ले पुरातत्व वारसा) सदस्य गणेश कोरे,सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेचे अध्यक्ष राहूल जोशी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.