महाविद्यालयांची मुजोरी कायम! विद्यापीठाच्या पत्राला केराची टोपली

परीक्षा अर्ज भरण्यात अडथळे
Pune University
Pune UniversitySakal
Updated on

पुणे : महाविद्यालयाचे शुल्क भरले नाही म्हणून परीक्षा अर्ज विद्यापीठाकडे न पाठविता महाविद्यालयांकडून अडवणूक सुरू आहे. याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये असे तंबी देणारे पत्र काढले. त्यानंतरही महाविद्यालयांची मुजोरी सुरूच असल्याचे तक्रारी विद्यापीठाकडे येत आहेत.(colleges ignored the letter issued by the board of examiners of the University of Pune urging the not to obstruct the students)

विद्यापीठाने १५ जून पासून २०२०-२१ या वर्षातील द्वितीय सत्र परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी सध्या परीक्षा अर्ज भरून घेतले जात आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरल्यानंतर ते महाविद्यालयांच्या लॉगइनमध्ये दिसतात. महाविद्यालयांनी अर्जातील माहिती बरोबर आहे की नाही हे तपासून त्याची आवक नोंद (इनवर्ड) करून विद्यापीठाकडे पाठविणे गरजेचे आहे.

Pune University
लष्कर भरती पेपर फुटी प्रकरणी लेफ्टनंट कर्नलला कोठडी

कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क भरता आलेले नाही. उर्वरित शुल्क भरले नाही तर परीक्षेचे अर्ज विद्यापीठाकडे पाठवले जाणार नाहीत, असा पवित्रा महाविद्यालयाने घेतला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी विद्यापीच्या परीक्षा विभागाकडे तक्रारी केल्यानंतर परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी शुल्क भरले नाही म्हणून परीक्षा अर्ज अडवून ठेऊ नये, त्वरित सर्व अर्जांची आवक नोंद करून विद्यापीठाकडे पाठवावेत असे आदेश दिले आहेत. हे आदेश काढून चार-पाच दिवस झाले तरी विद्यार्थ्यांच्या तक्रारी कायम आहेत. याच्या लेखी तक्रार करण्यासाठी स्वतंत्र गुगल फॉर्म किंवा इमेल आयडी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

युक्रांदचे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे म्हणाले, ‘‘संपूर्ण फी भरल्याशिवाय अर्ज विद्यापीठाकडे पाठवले जाणार नसल्याचे सांगितले महाविद्यालय सांगत आहेत. ही बाब गंभीर असून विद्यापीठाच्या पत्राला महाविद्यालयांनी केराची टोपली दाखवली आहे. अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्यात यावी. तसेच तक्रार नोंदविण्यासाठी स्वतंत्र गुगल फॉर्म किंवा ई-मेल उपलब्ध करून द्यावा.’’

Pune University
पुण्यात १४९ केंद्रांवर आज लसीकरण मोहीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()