पुणे - शहरात वर्दळीच्या कालावधीत अवजड वाहनांवरील बंदीची वाहतूक पोलिसांकडून कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच, ट्रिपल सीट, ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे.
गेल्या १५ दिवसांत सुमारे २५ हजार वाहनचालकांवर कारवाई केली असून, दोनशेहून अधिक वाहने जप्त केली आहेत. विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यास सहा महिन्यांसाठी वाहन जप्त करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.