Bogus Seeds : शेतकऱ्याने मिळविली बोगस बियाणांची नुकसान भरपाई

शेतकरी सुकाणू समितीला यश ः रोख २५ हजार रुपये, अर्धा किलो बियाणे
Bogus Seeds
Bogus Seedsesakal
Updated on

पुणे ः खासगी बियाणे कंपनीकडून खरेदी केलेल्या मिरचीच्या बियाणात फसवणूक झालेल्या एका शेतकऱ्याने या कंपनीकडून या बोगस बियाणांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळविली आहे. या शेतकऱ्याने सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करत, या कंपनीकडून रोख २५ हजार रुपये आणि अर्धा किलो मिरची बियाणे अशी नुकसान भरपाई मिळविली आहे. नुकसान भरपाई मिळविणारे हे शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्याचे शेतकरी सुकाणू समितीचे अध्यक्ष आहेत. बियाणांमध्ये फसवणूक करणाऱ्या कंपन्यांना शेतकरीसुद्धा धडा शिकवू शकतो, हेच यातून सिद्ध झाले आहे.

Bogus Seeds
Nandurbar Agriculture News: स्ट्रॉबेरी, सफरचंदापाठोपाठ सातपुड्यात ड्रॅगन फ्रुटची शेती; कोरडवाहू जमिनीत यशस्वी प्रयोग

बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करू नये, अन्यथा कंपन्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, हेच या उदाहरणातून शेतकरी सुकाणू समितीने दाखवून दिले आहे. रोहन घाडगे असे नुकसान भरपाई मिळविणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांची विविध खते व बी-बियाणे कंपन्यांकडून फसवणूक होत असते. या प्रचंड मोठ्या आर्थिक व राजकीय शक्तीच्या कंपन्यांपुढे शेतकरी हतबल ठरतो व त्यातूनच तो सातत्याने माघार घेत असतो. परंतु याला शेतकरी सुकाणू समितीचे पंढरपूर तालुकाध्यक्ष घाडगे हे अपवाद ठरले आहेत. त्यांनी कंपनीबरोबर संघर्ष करून शेतीच्या बियाण्यांच्या फसवणुकीच्या बदल्यात नुकसान भरपाई मिळवली आहे.

Bogus Seeds
Nashik News : इगतपुरीत 24 तासांत 100 मिमिपेक्षा जास्त पाऊस! धुक्यामुळे वर्दळीचा मुंबई-आग्रा महामार्ग मंदावला

यासंदर्भात बोलताना घाडगे म्हणाले, ‘‘ जालना येथील सफल सीड्स या कंपनीकडून मी ६ एप्रिल २०२४ रोजी सपना या जातीचे मिरची बियाणे खरेदी करून, त्याची लागवड केली होती. त्यानंतर या बियाणांतून निर्माण झालेल्या मिरचीच्या रोपांनी काही कालावधीपर्यंत खते आणि औषधे यांना चांगला प्रतिसाद दिला. पण त्यानंतर साधारण दीड महिन्यानंतर रोपांनी खते आणि औषध फवारणीला प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे ही माहिती देण्यासाठी कंपनीशी संपर्क साधला. पण कंपनीकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांची प्रत्यक्ष भेट घेतली. तरीही प्रतिसाद मिळेना गेला. शेवटी या कंपनीला धडा शिकविण्यासाठी आणि या कंपनीकडून शेतकऱ्यांची होणारी संभाव्य फसवणूक टाळण्याच्या उद्देशाने ७ जून रोजी राज्याच्या कृषी विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली.’’

‘बोकड्या’मुळे ६६ टक्के नुकसान

या तक्रारीनंतर कृषी विभागाने १३ जून २०२४ रोजी या मिरची पिकाचा पंचनामा केला. या पंचनाम्यानुसार मिरचीवरील बोकड्या रोगामुळे ६६ टक्के नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला. याउलट सपना ही मिरचीची जात बोकडया या रोगाला कमी प्रमाणात बळी पडते, असा दावा कंपनीने केला होता. मात्र सोलापूर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने याबाबतचा अहवाल राज्याच्या कृषी आयुक्तांना पाठविला. या अहवालाच्या आधारे घाडगे यांना झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून रोख २५ हजार रुपये आणि अर्धा किलो मिरची बियाणे मोफत देण्याची तयारी कंपनीने दर्शविल्याचे रोहन घाडगे यांनी सांगितले.

Bogus Seeds
Nandurbar Agriculture News: स्ट्रॉबेरी, सफरचंदापाठोपाठ सातपुड्यात ड्रॅगन फ्रुटची शेती; कोरडवाहू जमिनीत यशस्वी प्रयोग

शेतकऱ्यांच्या हतबलतेचा फायदा उठवत, अनेक बियाणे कंपन्या या शेतकऱ्यांची फसवणूक करत असतात. मात्र यापुढे शेतकऱ्यांची फसवणूक करता येणार नाही, हाच संदेश या उदाहरणातून शेतकरी सुकाणू समितीने खासगी कंपन्यांना दिला आहे. यामुळे शेतकरी न घाबरता, फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात तक्रार करण्यास पुढे येतील, अशी अपेक्षा आहे.

- ॲड. श्रीकांत करे, अध्यक्ष, शेतकरी सुकाणू समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.