पुणे : पुनर्वसन प्रकल्पाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम; तक्रार दाखल

पुणे : पुनर्वसन प्रकल्पाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम; तक्रार दाखल
Updated on

गोखलेनगर (पुणे) : शिवाजीनगर वडारवाडी सिटी सर्व्हे नंबर.९५१,फ्लट नं.३३४ येथे पुनर्वसन प्रकल्प सुरू असून, सदरील प्रकल्पाच्या जागेवर ठेकेदाराने २०१८ साली बांधकामास सुरुवात केली असून, सदरील जागेवर कंपाऊंड म्हणून पत्र्याचे शेड मारण्यात आले. कंपाउंडच्या एका बाजूस नागरिकांना तसेच बांधकाम साहित्य येण्याजोगी मोकळी बोळ सोडून कंपाऊंड आतील बाजूस घेतले आहे.

कंपाउंड आतमध्ये घेतलेल्या प्रकल्पाच्या जागेवर अतिक्रमण करुन बांधकाम केल्याप्रकरणी ठेकेदार निलेश खेडेकर यांनी  चतुश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. गजराज मित्र मंडळाचे अध्यक्ष रवि यल्लप्पा कांबळे, विजय गोसावी,युवराज कदम, सौरभ कांतीमणी यांच्या विरोधात कलम ४४७ व कलम ३४ (सार्वजनिक ठिकाणी सामुदायिकरीत्या अतिक्रमण करणे)या प्रमाणे तक्रार नोंद झाली असून पुढील तपास डी एस शिंदे हे करित आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"महापालिकेने संबंधित ठेकेदाराला सांगितल्याप्रमाणे तक्रार नोंदवून घेतली आहे, जबाब नोंदवून घेतले आहेत. महापालिकेशी पत्रव्यवहार सुरू आहे. लवकरच संबंधितांना कोर्टात हजर केले जाईल".

- दत्तात्रय शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक.

"मूर्ती ठेवण्याची जागा धोकादायक झाल्यामुळे पत्राऐवजी तात्पुरते कंपाऊंडच्या बाहेर बांधकाम केले होते. परंतु बिल्डर ने सदरील जागा ही इमारतीच्या मार्जिन मध्ये येते असल्याचे पोलीसाना व आम्हाला सांगितले. त्यानंतर आपण मोजणी करा जर मार्जिन मध्ये येत असेल तर आम्ही तो भाग पाडून टाकू असे आम्ही पोलिसांना व बिल्डरला सांगितले. नंतर पोलिसांनी आम्हाला बोलावून एस.आर .ए च्या बांधकाम इमारत मार्जिनमध्ये येत आहे,असे पत्र दिले आहे. त्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सदरील प्रकरणाबाबत दोन्ही बाजूंच्या व्यक्तीशी चर्चा झाली असून मंडळाने बांधकाम पाडणेबाबत व बिल्डरने गुन्हा मागे घेण्याबाबत सहमती दर्शवली आहे .मंडळाच्या काही कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे बांधकाम पाडण्याचे काम थांबले आहे"

- रवी कांबळे, अध्यक्ष, गजराज मित्र मंडळ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()