Pune: समोस्यामध्ये चक्क कंडोम, गुटखा आणि खडे, पुण्याच्या ऑटो कंपनीमध्ये घडतंय तरी काय?

Pimpari Chinchwad: "दोन आरोपींनी आम्हाला सांगितले की, ते एसआरए एंटरप्रायझेसचे कर्मचारी आहेत आणि त्यांच्या भागीदारांनी मनोहर एंटरप्रायझेस पुरवठा करत असलेल्या अन्नात भेसळ करण्यासाठी पाठवले होते"
Condoms, gutkha and pebbles in samosas, in an auto company in Pune.
Condoms, gutkha and pebbles in samosas, in an auto company in Pune.Esakal
Updated on

पिंपरी-चिंचवडमधील एका प्रतिष्ठित ऑटोमोबाईल कंपनीला पुरवलेल्या समोश्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि खडे अढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये एका उपकंत्राटदार कंपनीच्या दोन कामगारांचा समावेश आहे. ज्यांना समोसे पुरवठ्याचे कंत्राट मिळाले होते. तसेच ते भेसळ केल्याप्रकरणी यापूर्वी कारवाई करण्यात आलेल्या अशा अन्य फर्मचे तीन भागीदार आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, "यापूर्वी कारवाई झालेल्या तीन भागिदारांना त्यांचे कंत्राट गेल्याचा राग होता. त्यामुळे नवे कंत्राट मिळालेल्या पुरवठादाराला बदनाम करण्यासाठी त्यांनी त्यांचे दोन कर्मचारी नव्या कंत्राटदाराकडे कामाला लावले होते.

"कॅटलिस्ट सर्व्हिस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या फर्मकडे ऑटोमोबाईल कंपनीच्या कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ पुरविण्याचे कंत्राट आहे. या फर्मने मनोहर एंटरप्रायझेस नावाच्या दुसऱ्या उपकंत्राटदार कंपनीला समोसे पुरवण्याचे कंत्राट दिले होते. शनिवारी ऑटोमोबाईल कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना समोश्यामध्ये कंडोम, गुटखा आणि खडे सापडले," असे अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले.

Condoms, gutkha and pebbles in samosas, in an auto company in Pune.
Jitendra Awhad : पंचपक्वान्नाच्या ताटावरून अजित पवार पत्रावळीवर ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची टीका

या प्रकरणी मनोहर एंटरप्रायझेसच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यानंतर, असे समोर आले की फिरोझ शेख आणि विकी शेख या दोन कर्मचाऱ्यांनी समोश्यामध्ये कंडोम, गुटखा आणि खडे भरले होते, अशी माहिती चिखली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हे अधिकारी पुढे म्हणाले, "या घटनेची गंभीर दखल घेत आम्ही आरोपींवर विषाद्वारे दुखापत करणे आणि गुन्हेगारी कट रचणे या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. दोन आरोपींनी आम्हाला सांगितले की ते एसआरए एंटरप्रायझेसचे कर्मचारी आहेत आणि त्यांच्या भागीदारांनी मनोहर एंटरप्रायझेस पुरवठा करत असलेल्या अन्नात भेसळ करण्यासाठी पाठवले होते"

Condoms, gutkha and pebbles in samosas, in an auto company in Pune.
Water Shortage : पुणे जिल्ह्यात पाणीबाणी! गावे व वस्त्यांमध्ये टँकर सुरू करण्याची वेळ आली प्रशासनावर

ऑटोमोबाईल कंपनीला यापूर्वी SRA एंटरप्रायझेसला अन्नपुरवठा करायचे. पण ते पुरवत असलेल्या अन्नामध्ये मलमपट्टी आढळली होती. त्यानंतर कंपनीने त्याचा करार रद्द केला होता. या रागातून त्यांनी मनोहर एंटरप्रायझेसची बाजारातील प्रतिष्ठा खराब कराण्यासाठी हे कृत्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.