Pune Politics : "मी लढणारा कार्यकर्ता, त्यामुळे..."; पुणे लोकसभा लढवण्याबाबत धंगेकरांनी स्पष्ट केली भूमिका

Congress MLA Ravindra Dhangekar
Congress MLA Ravindra Dhangekaresakal
Updated on

देशातील पाच राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणूका पार पडल्या. यानंतर आता सर्व राजकीय पक्षांकडून आगमी लोकसभा निवडणूकीची तयारी केली जात आहे. लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून यादरम्यान पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याबाबत कसबा मतदार संघाचे आमदार काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मोहन दादांच्या मागे आम्ही सगळे उभे आहोतच. पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या मागे आम्ही उभे आहोतच, दादांना (मोहन जोशी) यांना तिकीट दिलं तर उत्तम आहे. दादा कित्येक वर्षांपासून पुणे शहरात काम करत आहेत, पक्षांनी त्यांचा विचार केला पहिजे. विचार केला तर उत्तम आहे, नाहीतर पक्ष म्हणून जो उमेदवार असेल त्याच्या पाठिशी उभे राहणार, असे धंगेकर म्हणाले.

तुम्ही लोकसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारला असता मी लढणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला आत्ता कुठली निवडणूक लढवा म्हटले तर मी तयार असतो. काँग्रेस पक्ष सांगेल ती निवडणूक लढवायला मी तयार आहे असे रविंद्र धंगेकर म्हणाले.

Congress MLA Ravindra Dhangekar
Maharashtra Politics: धनंजय मुंडे- पंकजा मुंडे आज एकाच व्यासपीठावर; CM शिंदे, अजित पवार, फडणवीसांचीही उपस्थिती, काय आहे कारण?

धंगेकरांनी पुणे लोकसभा लढवण्याची तयारी रविंद्र धंगेकरांनी दाखवली आहे. यासोबतच दुसरा कोणी उमेदवार काँग्रेस पक्षाने दिला तर त्याच्या पाठिशी देखील आपण उभे राहू असेही धंगेकर म्हणाले आहेत. मात्र पुणे लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आमने-सामने येण्याची शक्यता आहे.त्यामुळे ही जागा कोण लढवतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Congress MLA Ravindra Dhangekar
Pune School Bus Accident : पुण्यात स्कूल बसचा भीषण अपघात! सीसीटीव्ही फुटेज आलं समोर; चालकावर गुन्हा दाखल

धंगेकरांनी पुणे लोकसभा लढवण्याची तयारी रविंद्र धंगेकरांनी दाखवली आहे. यासोबतच दुसरा कोणी उमेदवार दिला तर त्याच्या पाठिशी देखील आपण उभे राहू असेही धंगेकर म्हणाले आहेत. मात्र पुणे लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आमने-सामने येण्याची शक्यता आहे.त्यामुळे ही जागा कोण लढवतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.