Pune Congress : काँग्रेसचा पुण्यातील पाच मतदारसंघांवर दावा, १४ इच्छुकांचे अर्ज देखील झाले दाखल

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पाच विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसने दावा सांगितला आहे.
congress
Congressesakal
Updated on

पुणे - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पाच विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसने दावा सांगितला आहे. दरम्यान, शहरातील आठ जागांसाठी १४ इच्छुकांनी आत्तापर्यंत पक्षाकडे अर्ज केला आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणूकही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढवण्याचा निर्णय तिन्ही पक्षांनी घेतला आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. परंतु आघाडीतील तिन्ही पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यांनी यापूर्वी शहरातील सर्व जागांवर दावा केला आहे. या पाठोपाठ काँग्रेसने आता शहरातील आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघांवर दावा केला आहे.

शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (ता. ९) साप्ताहिक बैठक झाली. त्यामध्ये पाच जागांवर दावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार आहे. तर मागील विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या दोन्ही मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला होता.

त्यामुळे या तिन्ही मतदारसंघांबरोबरच पर्वती आणि हडपसर या दोन्ही मतदारसंघांवरही दावा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, असे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांकडून पक्षाने अर्ज मागविले होते. आतापर्यंत पक्षाकडे १४ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.