पुणे : ससून रुग्णालयासमोरील मोक्याची प्रशस्त सव्वादोन एकरची जागा रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निधी उभारणीच्या नावाखाली कवडीमोल दराने खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करीत आंदोलन केले़ .